MB NEWS:बीडचे प्राप्तीकर कार्यालय आणि कार्यालयाचे कामकाज पूर्ववत सुरू ठेवून नागरीकांची होणारी गैरसोय रोखा - खा.डाॅ.प्रितम मुंडे यांनी केली मागणी

 

बीडचे प्राप्तीकर कार्यालय आणि कार्यालयाचे कामकाज पूर्ववत सुरू ठेवून नागरीकांची होणारी गैरसोय रोखा - खा.डाॅ.प्रितम मुंडे यांनी केली मागणी



नवी दिल्ली......

बीड येथील प्राप्तीकर विभागाच्या कार्यालयाचे कामकाज अंशतः औरंगाबाद तसेच जालना येथील कार्यालयाकडे वर्ग केल्यामुळे जिल्ह्यातील व्यापारी व करदात्या नागरीकांची गैरसोय होत असल्याची बाब  निदर्शनास आल्यानंतर खा.डाॅ.प्रितम मुंडे यांनी काल यासंदर्भात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री श्री.अनुराग ठाकूर यांची दिल्ली येथे भेट घेतली.


जिल्ह्यातील नागरीकांना आर्थिक व व्यावसायिकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या कामांनिमित्त औरंगाबाद किंवा जालन्याला जाने गैरसोयीचे व वेळेचा अपव्यय करणारे असल्याची भूमिका यावेळी मांडली.तसेच जिल्ह्यातील व्यापारी व नागरीकांच्या दृष्टीने सोयीचे असलेले बीडचे प्राप्तीकर कार्यालय आणि कार्यालयाचे कामकाज पूर्ववत सुरू ठेवून नागरीकांची होणारी गैरसोय रोखण्याची विनंती केली.


यावेळी मा.मंत्री श्री.अनुराग ठाकूर यांनी मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन नागरीकांची गैरसोय दूर करण्याचे आश्वासन दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !