MB NEWS:उद्धव ठाकरेंसह शरद पवार, अनिल देशमुख यांना धमकीचा फोन, एकाला अटक

 *⭕उद्धव ठाकरेंसह शरद पवार, अनिल देशमुख यांना धमकीचा फोन, एकाला अटक⭕*


  मुंबई : 'मातोश्री' उडवून देण्याच्या धमकीचे फोन करणाऱ्याला कोलकात्यातून अटक करण्यात आली आहे. पलाश बोसने मातोश्रीसह गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकीचे फोन केले. राजकीय पक्षाशी संबंध नसल्याची माहिती एटीएसने दिली आहे. मातोश्री उडवून देण्याच्या धमकीचे फोन करणाऱ्याला कोलकात्याहून अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी 'मातोश्री' हे निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा फोन गेल्या आठवड्यात मातोश्रीवर आला होता. त्यावेळी दाऊदचा हस्तक असल्याचा दावा फोन करणाऱ्यानं केला होता. तसंच हा फोन दुबईहून आल्याचा दावा केला जात होता. 

      एटीएसने याप्रकरणी तपास केला असता हा फोन दुबईहून नव्हे तर कोलकात्याहून केल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात ४९ वर्षांच्या एका व्यक्तीला कोलकात्यातल्या टोलेगंज भागातून अटक करण्यात आली आहे. अटक करणाऱ्या व्यक्तीचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे एटीएसने स्पष्ट केले आहे. याच व्यक्तीने 'मातोश्री'सह गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमक्या दिल्या होत्या. त्याने या धमक्या का दिल्या, त्याची चौकशी सुरू आहे.

     दरम्यान, धमकीसाठी त्याने इंटरनॅशल सिमकार्डचा वापर केला होता. धमकी देणारी व्यक्ती दूबईत राहत होता, हे तपासात उघड झाले आहे. याची माहिती एटीएसने पत्रकार परिषदेत दिली. अटक केलेल्या व्यक्तीला कोलकातामधून मुंबईत आणण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले जाईल, असे एटीएसने सांगितले.


      दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी शनिवारी ५ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अज्ञान व्यक्तीकडून धमकीचा फोन आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ठार मारु आणि मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीच्या या फोननंतर मातोश्री आणि ठाकरे कुटुंबाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. उद्धव ठाकरेंना दिलेल्या धमकीनंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी, आम्ही शिवसैनिक अभेद्य भिंत बनून मातोश्रीचं रक्षण करु अशी प्रतिक्रिया देत याचा निषेध केला होता. आता एटीएसच्या तपासात कोणी फोन केला याची माहिती उघड झाली आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !