MB NEWS:राहुलच्या शिक्षणास मिळाला आधार माणुसकीचा

 राहुलच्या शिक्षणास मिळाला आधार माणुसकीचा


..............................

      अंबाजोगाई ( प्रतिनिधी )  अंबाजोगाई तालुक्यातील डॉगर पट्यात वसलेल्या छोट्याशा मंगईवाडी या गावातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील राहुल रामदास शिंदे या विध्यार्थीने परिस्थितीवर मात करत इयत्ता दहावी मध्ये 92% गुण घेऊन केंद्रात प्रथम आला.

           राहूलला पुढे विज्ञान शाखेतुन वैद्यकीय अभ्यासक्रमाची तयारी करण्याची  तीव्र इच्छा , परंतु आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने पुढील शिक्षण कसे करावयाचे या चिंतेत राहूलचे कुटुंबिय होते.

               राहुलला गुणवत्ता पूर्वक शिक्षण मिळण्यासाठी  प्रयत्न करणारे 

 "आधार माणुसकीचा " उपक्रमाचे प्रमुख ऍड संतोष पवार यांनी सिनर्जी नॅशनल स्कूलच्या संचालक मंडळासमोर राहुलच्या कुटुंबाच्या परिस्थिती माहिती सांगितली  असता ,स्कूलच्या संचालक मंडळाने सामाजिक दाईत्व जोपासत इयत्ता 11/12 वी विज्ञान-नीट व स्कूलबस सह पुर्ण शिक्षण विनाशुल्क करण्याचा निर्णय घेतला,या अनुषंगाने राहुलचे 11 वी विज्ञान शाखेत बुधवारी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली, प्रवेश प्रसंगी सिनर्जी स्कूलच्या प्राचार्या भविका शहा, प्रा सागर,प्रा समीर भास्करे व संस्थेचे अध्यक्ष संदीपान रेड्डी, सचिव रमाकांत माने, संचालक डॉ अनिल भुतडा,डॉ श्रीनिवास रेड्डी यांनी सहकार्य केले.प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यावर राहुलच्या चेहऱ्यावरील आनंद खूप काही सांगून जात होता.

           राहुलच्या शिक्षणाचा प्रश्न सुटल्यानंतर  निवास-भोजनाची सोय व्हावी यासाठी ऍड संतोष पवार यांनी ज्ञान-संस्कार वसतिगृहाचे संचालक नामदेव मुंडे यांना राहूल च्या निवास व भोजनाची दोन वर्षांची व्यवस्था मोफ़त करण्यासाठी विनंती केली असता त्यांनी राहुलच्या निवास-भोजनाची व्यवस्था विनाशुल्क करण्याचे मान्य केले,यासाठी चाटे सर यांचे सहकार्य लाभले.तसेच राहुलला ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी मोबाईल उपलब्ध करून देण्याचे अभियंता परमेश्वर भिसे यांनी अश्व।सन दिले.

...................................

सिनर्जी नॅशनल स्कूल-वाघाळा व ज्ञान-संस्कार वसतिगृह-अंबाजोगाई यांनी राहुल शिंदे यास शिक्षणासाठी दिलेला आधार निश्चितच राहुलचे भविष्य उज्वल होण्यासाठी मोलाचा ठरणार आहे,राहुल वैद्यकिय शिक्षणासाठी    पात्र होऊन महाविद्यालय व वसतिगृहाचे नावं उंचावेल.

                  ऍड संतोष पवार

                  आधार माणुसकीचा

........................................

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !