इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:पंकजाताई मुंडे यांची भाजप राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती ; परळीत फटाके वाजवून कार्यकर्त्यांनी केला आनंदोत्सव राष्ट्रीय स्तरावर पक्षाची मोठी जबाबदारी ;कार्यकर्त्यात उत्साह

 पंकजाताई मुंडे  यांची भाजप राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती ; परळीत फटाके वाजवून कार्यकर्त्यांनी केला आनंदोत्सव


 राष्ट्रीय स्तरावर पक्षाची मोठी जबाबदारी ;कार्यकर्त्यात उत्साह


परळी वैजनाथ....

     माजी मंत्री तथा महाराष्ट्र भाजपाच्या कोअर कमिटी सदस्य पंकजाताई मुंडे यांची भाजप राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती  झाल्याचे वृत्त धडकताच परळीत फटाके वाजवून कार्यकर्त्यांनी  आनंदोत्सव केला. या महत्त्वपूर्ण संघटनात्मक निवडीचे स्वागत होत असुन आपल्या नेतृत्वाला राष्ट्रीय स्तरावर पक्षाची मोठी जबाबदारी मिळाल्याने कार्यकर्त्यात उत्साह संचारला आहे.


      भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील चार तरुण चेहर्यांना संधी देण्यात आली आहे.  नव्या कार्यकारिणीत  पंकजा मुंडे यांच्यावर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.भाजप राष्ट्रीय सचिव म्हणून पंकजा मुंडे यांची  नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती मुळे परळीसह बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यात उत्साह संचारला आहे.


 या निवडीचे भाजप कार्यकर्त्यांनी स्वागत केले असुन परळीसह बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यात उत्साह संचारला आहे.परळीत चौका चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून कार्यकर्त्यांनी या नियुक्ती चा आनंद साजरा केला आहे. आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निवडीबद्द्ल परळीत भाजपायुमोचे बीड जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, भाजप तालुकाध्यक्ष सतिश मुंडे, भाजप युवा नेते  राजेश गित्ते, डॉ.शालिनी कराड, यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी भीमराव  मुंडे,उमेश खाडे, राजेंद्र ओझा, रवि कांदे,संतोष सोळंके, सुरेश माने,बाळू फड,अजय गित्ते ,गणेश होळंबे,अरुण पाठक, योगेश पांडकर,वेदांत सारडा,अंकुश मुंडे,सुरेश सातभाई,दीपक नागरगोजे, सुशील हरंगुळे,नितीन मुंडे,राहुल मिसाळ,अजय गोरे , मोहेकर आदी असंख्य कार्यकर्ते  उपस्थित होते.

Video



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!