MB NEWS:आर्य समाजामुळे हैदराबाद संग्रामास पूर्णत्व प्राप्त झाले"---------अभ्यासक डॉ सोमनाथ रोडे यांचे प्रतिपादन.

 आर्य समाजामुळे हैदराबाद संग्रामास पूर्णत्व प्राप्त झाले -अभ्यासक डॉ. सोमनाथ रोडे यांचे प्रतिपादन    


     
                               परळी वैजनाथ ,दि.१८-.                निजामाच्या जुलमी राजवटीतून सामान्य जनतेला मुक्त करण्यासाठी आर्य समाजाने जो संघर्षमय लढा दिला, तो अतिशय जाज्वल्य असून युगानुयुगांपर्यंत प्रेरणा देत राहील. आर्य समाजाच्या बलिदानामुळे हैदराबादच्या क्रांतिकारी लढ्यास पूर्णत्व प्राप्त झाले, असे उद्गार प्रसिद्ध इतिहासतज्ञ प्राचार्य डॉ सोमनाथ रोडे यांनी काढले .            महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभेच्या वतीने गेल्या सप्ताहभर चाललेल्या "हैदराबाद संग्रामातील आर्यांची शौर्यगाथा" या वेबिनार व्याख्यानमालेच्या समारोपात काल(दि.१७) श्री रोडे प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते.  अध्यक्षस्थानी आर्य सभेचे प्रधान श्री योगमुनीजी हे होते .                                             आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून श्री रोडे यांनी आर्यसमाजाच्या क्रांतिकारी चळवळीचा इतिहास विशद केला. ते म्हणाले ,' आर्य समाजाची चळवळ ही सर्वव्यापी होती. धार्मिक ,सामाजिक आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य अशा तिन्ही पैलूवर  क्रांतिकारकांनी लढा दिला. यासाठी हजारो आर्यनेते    उत्तर भारतातून आले. त्यांनी हैदराबादच्या भूमीत स्वातंत्र्य संग्रामासाठी फार मोठे वातावरण निर्माण केले .अनेकांनी स्वसुखाची  पर्वा न करता प्राण तळहाती घेऊन मोठ्या धैर्याने हा संग्राम लढला. परिणामी भारतीय लष्कराला हैदराबाद संस्थान भारतात विलीन करणे शक्य झाले.    या संग्रामामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याची शौर्यगाथा खऱ्या अर्थाने परिपूर्ण झाली.'          ‌                                    प्राचार्य डॉ. रोडे यांनी आपल्या समयोचित भाषणातून विविध घटना प्रसंग यांचे मुद्देसूद विश्लेषण केले .        गेल्या आठवडाभरात विविध मान्यवर वक्त्यांनी हैदराबादच्या लढ्यावर वेगवेगळ्या अंगांनी प्रकाश टाकला. सर्वश्री पं. रमेश ठाकूर ,प्रा. अर्जुनराव  सोमवंशी , पंडित शिवकुमार शास्त्री, डॉ. मंजुलता विद्यार्थी , प्राचार्य देवदत्त तुंगार , सुभाष अष्टीकर आदींनी आपल्या विषयांवर अतिशय मार्मिक विवेचन केले. दररोज व्याख्यानांपूर्वी  भजनोपदेशक  पंडित भानुप्रकाश शास्त्री   भजने सादर  केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सभेचे मंत्री श्री राजेंद्र दिवे , आर्यवीर दल अधिष्ठाता व्यंकटेश हालिंगे व डॉ. नयनकुमार आचार्य यांनी केले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !