MB NEWS:डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या निधनाने समाजाची अपरिमित हानी - धनंजय मुंडे*

 


*डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या निधनाने समाजाची अपरिमित हानी - धनंजय मुंडे*


परळी दि. ०१ ---- : राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या निधनाचे वृत्त दुःखद असून त्यांच्या जाण्याने समाजाची अपरिमित हानी झाली आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.


अहमदपूरकर महाराज यांचे नुकतेच निधन झाले असून मृत्यूसमयी त्यांचे वय १०४ वर्षे होते. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू होते. महाराजांच्या निधनाने महाराष्ट्रासह विविध राज्यातील त्यांच्या अनुयायांवर शोककळा पसरली आहे.


महाराजांचे ८२वे श्रावणमास तपोनुष्ठान वैद्यांचा नाथ असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या परळी नगरीत झाले होते, त्याचे स्वागताध्यक्ष म्हणून महाराजांचा सहवास मला लाभला. स्वातंत्र्यपूर्व काळात एमबीबीएस चे शिक्षण पूर्ण केलेल्या अहमदपूरकर महाराजांनी आपले संपूर्ण जीवन लोककल्याणकारी, समाजाभिमुख तसेच राष्ट्रभक्ती शिकवणारे सामाजिक काम करण्यात घालवले. वयाच्या १०४व्या वर्षी देखील ते कार्यात व्यस्त असत, त्यांचे जीवन आदर्शवत व प्रेरणादायी होते. जलपुनर्भरण, वृक्ष लागवड व संवर्धन या क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते. त्यांचे हे योगदान समाज कधीही विसरणार नाही; असेही यावेळी ना. धनंजय मुंडे म्हणाले.


दरम्यान दोनच दिवसांपूर्वी नांदेड येथील संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा करून त्यांच्या प्रकृती बाबत विचारणा केली होती आणि आज त्यांच्या निधनाचे वृत्त धडकले, महाराजांच्या जाण्याने समाजाची अतोनात हानी झाली असून, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असेही ना. मुंडे म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !