MB NEWS:अनुकंपा तत्त्वावर सेवेत घेण्या प्रकरणी टाळाटाळ ; नंदकिशोर चिखले यांचे परळी न.प. समोर अमरण उपोषण* मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार

 अनुकंपा तत्त्वावर सेवेत घेण्या प्रकरणी टाळाटाळ ; नंदकिशोर चिखले यांचे परळी न.प. समोर अमरण उपोषण*

मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार



परळी वैजनाथ - (प्रतिनिधी) 
      अनुकंपा तत्त्वावर सेवेत घेण्या प्रकरणी टाळाटाळ होत असल्याच्या कारणावरून नंदकिशोर चिखले यांनी परळी न.प. समोर अमरण उपोषण सुरू केले आहे.मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

     चंद्रकांत लक्ष्मणराव चिखले यांनी परळी नगर परिषद येथे सफाई कर्मचारी म्हणून बारा वर्षे सेवा केल्या नंतर सेवा चालू असतानाच दिनांक - १/९/२०१५ रोजी पाणीपुरवठा मोटार पंपाचे काम करत असताना त्यांचा मृत्यू झाला.लाड कमिटीच्या शिफारशी नुसार सेवेतील मयत कर्मचाऱ्याच्या जागी कुटुंबातील व्यक्तीस सेवेत सामावून घेणे अपेक्षित असताना, वडिलांच्या जागी परळी वैजनाथ नगर परिषदेत नौकरी मिळण्यासाठी नंदकिशोर चिखले यांनी दिनांक ०२/११/२०१५ रोजी अर्ज केला परंतु उडवा उडवीच्या उत्तरा शिवाय पदरात काहीही पडले नाही. न.प.कडे विनंती अर्ज करून ५ वर्ष झाली तरी त्यावर कसल्याच प्रकारे विचार केला गेला नाही. हा माझ्या कुटुंबावर जाणीवपूर्वक केलेला अन्याय नाही का ? असा सवाल नंदकिशोर चिखले यांनी केला.
माझे वडील सेवेत असताना मयत झाल्यानंतर परळी वैजनाथ नगर परिषदेकडे येणे असलेली " सेवा उपदान रजा रोकिकरण, फरकाची रक्कम, पदोन्नतीतील फरकाची रक्कम " अद्यापही दिली गेली नाही. या बाबत वेळोवेळी नगर परिषदेतील संबंधित विभागाकडे चौकशी करत गेलो, परंतू प्रत्येक वेळी बजेट शिल्लक नसल्याचे कारण दाखवत उडवा उडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचे काम सतत ५ वर्षांपासून नगर परिषदेकडू केल्या गेले. त्यामुळे मला उपोषणाला बसल्या शिवाय पर्यायच उरला नाही . त्यामुळे आपण परळी नगर परिषद कार्यालया समोर दिनांक १० सप्टेंबर २०२० रोजी पासुन कुटुंबासह अमरण उपोषण करत आहोत. मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे नंदकिशोर चिखले यांनी  नमूद केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार