इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB News:शासनाच्या विविध योजनेच्या लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन

 शासनाच्या विविध योजनेच्या लाभार्थ्यांनी

ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन



बीड, दि,2 :- (जि.मा.का.)  संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृतीवेतन योजना शासनाकडून राबविण्यात येतात या विविध योजनांचे लाभार्थी मंजूर करण्याकरिता महाऑनलाईन यांच्या मार्फत संगणकीय प्रणाली तयार करण्यात आली असून बीड जिल्हयातील लाभार्थ्यांनी http://mahaonline.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन, उपजिल्हाधिकारी  प्रकाश पाटील बीड यांनी केले आहे.

        संजय गांध निराधार अनुदान योजना,श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेचे निकष  पुढीलप्रमाणे आहेत.

       अर्ज करण्यासाठी सर्व महा ईसेवा केंद्र, आपले सरकार केंद्र यांच्यामार्फत अर्ज करावेत. ग्राहक सेवा केंद्रामार्फत राष्ट्रीयकृत बँक, पोस्ट बँकमध्ये सध्याच्या सर्व लाभधारकांनी आपले खाते 15 सप्टेंबर 2020 उघडावे, राष्ट्रीयकृत बँके व्यतिरिक्त खाते असल्यास लाभार्थ्यांचे अनुदान पाठविण्यात येणार नाही . यासाठी पोस्टमन किंवा तलाठी यांच्याशी संपर्क साधावा. 

                                                                    ******


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!