MB NEWS: मंजुश्री घोणे यांनी लिहिलेला विशेष लेख- मी अबला नाही तर सबला आहे

 मी अबला नाही तर सबला आहे

   -------------------------------------------------------------------


    मी अबला नाही तर सबला आहे




- •
मंजुश्री सुरेश घोणे

 "यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता"अशी स्त्री यांची महती गाणारी आमची भारतीय संस्कृती !याच संस्कृतीची दयनीय स्थिती झाल्याचा प्रत्यय वर्तमानपत्रे चाळताना आम्हाला तुम्हाला येताना दिसतोय.. 

-----------------------------------------------------------------------------




"यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता"

अशी स्त्री यांची महती गाणारी आमची भारतीय संस्कृती !

याच संस्कृतीची दयनीय स्थिती झाल्याचा प्रत्यय वर्तमानपत्रे चाळताना आम्हाला तुम्हाला येताना दिसतोय.. 

आता आजचाच घ्या. आजच्या वर्तमानपत्रात पुन्हा एकदा बलात्काराची बातमी वाचली. 

बलात्कार ही देशातील एक मोठी समस्या झाली आहे.

नुकताच दिल्लीतिल ताईला न्याय मिळाला. आणि हैदराबादची घटना समोर आली. हैदराबादच्या ताईलाही न्याय मिळाला. आणि आताही मध्यप्रदेश मधली निशब्द घटना...

दिल्लीतील घटनेनंतर काही महाभागांनी यावर उपाय सुचवले.

मिरची पावडर आणि चाकू काहींनी तर मुलींचे कपडे जबाबदार ठरवले..

एखादी मुलगी तिच्या आवडीचे कपडे घालून रस्त्यावरून जात ही असेल हो. पण इतरांना तिच्यावर बलात्कार करण्याचा काय अधिकार..? या प्रश्नाचं उत्तर कोणी देऊ शकेल का..

अहो.. दिल्लीची ताई आपलं काम करून घरी जात होती. 

हैदराबादची प्रियंका ताई तर डॉक्टर होती. ती देखील आपलं काम करून घरी जात होती. 

आणि मध्य प्रदेशची मनीषाताई तर आईसोबत कामावर गेली होती... 

आता या तिन्ही घटनेमध्ये कपड्यांचा विषय आहे का हो.. 

या सर्व घटनांना दोन गोष्टी कारणीभूत आहेत. १) पुरुषांची वासना २) स्त्रियांना दिलेले दुय्यम स्थान...  

बलात्कार केल्यानंतर आपण पकडलो गेलो, तरी पोलिसांना मॅनेज करू शकू अशी मानसिकता गुन्हेगारांची झाली आहे. कायद्याची भीती राहिलेली नाही. पोलिसांचा वचक राहिलेला नाही. 

९०% लोक #justiceforManisha लिहीत आहेत.. दिल्ली, हैदराबाद, मध्यप्रदेश च्या घटना नाही अशा हजारो घटना आपल्या भारत देशात रोज घडत असतात. काही आपल्याला माहीत होतात. काही माहीत होत नाहीत. 

या एका मागील एक घटनेनंतर बलात्कार टाळण्यासाठी कोणत्याही हत्यारा शिवाय.. मिरची पावडर चाकू किंवा बंदूक.. योग्यवेळी वापर करण्याची हिंमत असावी लागते तसेच ते त्या वेळेस सुचाव ही लागतं.. 

जोपर्यंत परस्त्री ही मातेसमान अशी समाजाची मानसिकता होत नाही तोपर्यंत स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांची समस्या कायम राहील. स्त्रियांनी आपल्या संरक्षणाची काळजी स्वतः घ्यावी. कोणी मदतीला येईल आणि आपले रक्षण करेल ही भ्रामक कल्पना न करता अन्यायाचा प्रतिकार करायला शिकले पाहिजे. समाजातील एकूण चित्र पाहिले तर आजची स्त्री अद्यापही सुरक्षित नाही एवढे मात्र खरे आहे. ‌

यावर आता फक्त एकच उपाय

*#मी अबला नाही तर सबला आहे*


     - मंजुश्री सुरेश घोणे*

         परभणी

         मो. ९४२०८८४०४१

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार