MB NEWS:नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये कोरोनापासून सावधानता बाळगावी-प्रकाश सामत

 नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये

कोरोनापासून सावधानता बाळगावी-प्रकाश सामत 



परळी, (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यासह परळी तालुक्यात दिवसांन दिवस कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. या मुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे. नागरिकांनी विनाकारण, विना मस्क घराबाहेर पडू नये प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून सकारत्मक प्रयत्नाने कोरोनाला हद्दपार करावे असे आवाहन भाजपा जेष्ठ नेते तथा उद्योजक प्रकाश सामत यांनी केले आहे. 

           परळी शहरातील कोरोना बाधितांची संख्या गंभीर स्थितीत पोहचली असतानाही अनेक जण शहरात विनाकारण, विनामास्क  फिरत आहेत. त्यांनी आपली स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन कोरोना पासून बचाव करावा गर्दीच्या ठिकणी जाणे टाळावे, सोशल डिस्टर्सिंगचे काटेकोर पालन करावे. 

        शहरातील सर्व फेरीवाले विक्रेते, व्यापारी वर्गानेही स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन ग्राहकांनाही सुरक्षित ठेवावे सॅनिटायझरचा वापर वारंवार करावा प्रशासन कोरोना विरुद्ध मोठ्या प्रमाणात लढा देत आहे. परंतु नागरिकांनी सुद्धा स्वतःहून यात सकारत्मक सहभाग घेतल्या शिवाय प्रशासनाचे सर्व प्रयत्न अपुरे ठरत असून त्यामुळे कोरोनाचा प्रभाव वाढतच आहे. 

               कोरोनाची साखळी तोडायची असेलतर पण सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन प्रशासनास सहकार्य करून आपली व आपल्या कुटुंबाची योग्य काळजी घेऊन कोरोनाला रोखू शकतो असे प्रकाश सामत यांनी म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !