MB NEWS:भगवानरावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार* *ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांना जाहीर*

 *भगवानरावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार*

 *ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं.  बोराडे यांना जाहीर*



अंबाजोगाई - यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या वतीने दरवर्षी  दिला जाणारा राज्य पातळीवरील या वर्षीचा भगवानरावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार सुप्रसिध्द ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रावसाहेब उर्फ रा. रं. बोराडे यांना जाहीर झाला आहे. अशी माहिती यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

अंबाजोगाईच्या राजकारण, समाजकारण, साहित्य, संगीत, लोककला, सांस्कृतीक चळवळ, पत्रकारिता, सहकार शिक्षण क्षेत्रात ज्यांनी आपले योगदान देऊन अंबाजोगाईच्या इतिहासात आपले सुवर्णपान लिहिले असे भगवानरावजी लोमटे यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा पुरस्कार २०१३ या वर्षी पासून सुरू केला. सुसंस्कृत राजकारणी. साहित्यिक, संगीत गायक व रचनाकार, पत्रकार, नाट्य व चित्रपट अभिनय, सहकार, क्रीडा या क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तीस महाराष्ट्र पातळीवर हा  पुरस्कार दिला जातो. यापूर्वी यशवंतराव गडाख-पाटील, विजय कुवळेकर, पद्मश्री ना.धों. महानोर, रामदास फुटाणे, पं नाथराव नेरळकर, विजय कोलते व मधुकर भावे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या वर्षीचा हा  आठवा पुरस्कार बोराडे यांना जाहीर झाला आहे. 

रा. रं. बोराडे हे विसाव्या शतकातील साहित्यातील एक महत्वाचे व्यक्तिमत्व आहे. कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, वगनाट्य व समीक्षा या प्रकारात वैशिष्ठ्येपूर्ण विपुल लेखन केले आहे. विशेषतः ग्रामीण अस्मितेचा कलदार आविष्कार म्हणजे रा. रं. बोराडे सर. एक कृतिशील आणि समाजमनस्क साहित्यिक आहेतच पण त्यांच्या लेखणीला अस्सल मराठवाडाच्या मातीचा गंध आहे.त्यांचे लौकिक जीवन व साहित्यनिर्मिती यात अतूट व हार्दिक अनुबंध आहे. शरद जोशी यांच्या  शेतकरी संघटनेच्या आंदोलनानंतर त्यांच्या लिखाणात ग्रामीण जीवन सहज दिसू लागले होते.

बोराडे सरांच्या साहित्यलेखनाला १९७१ पासून सुरुवात झाली.

त्यांचे एकूण पंधरा कथासंग्रह,

 बारा कादंबऱ्या, बारा नाटके व एकांकिका प्रसिद्ध झाल्या आहेत. वगनाट्य व पथनाट्य पण त्यांनी लिहिली आहेत.  त्यांच्या या लिखाणात जशी गंभीरता आहे तशी विनोदीशैली हे खास वैशिष्ठ्ये आहे. त्यांची शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठान या नावाची संस्था असून नव्या पिढीतील साहित्यिकांना १९९८ सालापासून पुरस्कार दिले जातात. २००० ते २००४ पर्यंत ते महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते व त्याकाळात नवलेखकांसाठी अनुदान योजनेत आमूलाग्र बदल घडविले. त्यामुळे पुस्तक प्रकाशित करण्यास आर्थिक सहाय मिळू लागले. ग्रामीण साहित्याची चळवळी त्यांच्या प्रेरणेने अधिक गतिमान झाली. मराठवाडा शिक्षण मंडळातील अनेक महाविद्यालयात प्राचार्य म्हणून नावलौकिक मिळविला आहे.  महाराष्ट्र शासन, साहित्य संस्थांचे अनेक प्रतिष्ठितपुरस्कार त्यांना प्राप्त झाले. यशवंतराव चव्हाण स्मृती समिती अंबाजोगाईचा यशवंतराव चव्हाण स्मृती साहित्य पुरस्कार, अंबाजोगाई त्यांना देण्यात आला. त्यांचे व भगवानराव लोमटे यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते.

 त्यांना आठवा भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार जेष्ठ  साहित्यिक प्रा. रंगनाथ तिवारी, अंबाजोगाई यांच्या  हस्ते १९ सप्टेंबर २०२० शनिवार रोजी सायंकाळी ५ वाजता भगवानराव लोमटे बापू यांच्या आठव्या स्मृतीदिनी दिला जाणार आहे.  पुरस्कार वितरण समारंभ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  मोजक्या श्रोत्यांच्या उपस्थित वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालयात आयोजित केला जाईल अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात दगडू लोमटे यांनी दिली आहे. पत्रकावर प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, अब्दुल माजेद सिद्दीकी, सतीश लोमटे, प्रा. सुधीर वैद्य, प्राचार्य प्रकाश प्रयाग, प्रा. शर्मिष्ठा लोमटे, प्रा. भगवान शिंदे, प्रा. सागर मुंडे - लटपटे,व त्र्यंबक पोखरकर व मार्गदर्शक भगवानराव शिंदे बाप्पा व राजपाल लोमटे यांची नावे आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !