परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS:धनंजय मुंडेंचा मुंबईत जनता दरबार; असंख्य लोकांनी मांडल्या समस्या* *फोनवरून, पत्र देऊन अनेक प्रश्न जागीच निकाली*

 *धनंजय मुंडेंचा मुंबईत जनता दरबार; असंख्य लोकांनी मांडल्या समस्या*


*फोनवरून, पत्र देऊन अनेक प्रश्न जागीच निकाली*



*जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध - धनंजय मुंडे*


मुंबई (दि. ०३) ---- : मंत्रिमंडळातील सदस्य थेट जनतेला व पक्ष कार्यकर्त्यांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी उपलब्ध व्हावेत या खा. शरद पवार यांच्या संकल्पनेनुसार काल राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दुपारी दोन ते चार या वेळेत घेतलेल्या जनता दरबारास असंख्य नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या प्रश्न व समस्या मांडल्या. 


धनंजय मुंडे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत नागरिकांच्या तसेच पक्ष कार्यकर्त्यांच्या बहुतांश समस्या जागच्या जागीच संबंधितांना फोन करून किंवा आवश्यक पत्र देऊन जागच्या जागीच मिटवले.



या जनता दरबारास राज्यातील विविध जिल्ह्यातील असंख्य नागरिकांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी मधील घटक पक्षांच्या अनेक कार्यकर्त्यांनी हजेरी लावत आपल्या समस्या मंत्री महोदयांपुढे मांडल्या.



दरम्यान जनता दरबार ही संकल्पना नागरिक ते थेट मंत्री असा संवाद घडवून नागरिकांच्या समस्यांना थेट मंत्र्यांच्या समोर वाचा फोडण्यासाठी उपयुक्त ठरत असून, आम्ही नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार म्हणून कटिबद्ध आहोत. दर गुरुवारी मी ठरल्याप्रमाणे पुन्हा जनता दरबारास उपस्थित असेल, असे मत यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!