MB NEWS:पोलिस अधिक्षक राजा रामस्वामी यांची परळीला भेट!

 पोलिस अधिक्षक राजा रामस्वामी यांची परळीला भेट!



संभाजीनगर, शहर व ग्रामिण पोलिसांना केल्या बैठकीतून सूचना


परळी । प्रतिनिधी

बीड जिल्ह्याचे नवे पोलिस अधिक्षक राजा रामास्वामी यांनी परळी शहर, संभाजी नगर व ग्रामिण पोलिस स्टेशनला शुक्रवारी भेट दिली. शहर व तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा व पोलिस खात्याचा आढावा त्यांनी या भेटीत घेतला व अनेक प्रकारच्या सुचना त्यांनी पोलिसांना केल्या. कोरोनाच्या संकटात माणूसकीने आणि सतर्कतेने काम करण्याबरोबरच अनेक प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी अलर्ट राहण्याच्या सुचनाही त्यांनी भेटीदरम्यान दिलेल्या बैठकीत केल्या. चांगल्या कामासाठी सर्वांनी एकमेकांना सहकार्य करून एकमेकांचे मनोबल वाढवा असेही त्यांनी सांगितले. परळीच्या भेटीबद्दल तीन्हीही पोलिस ठाण्याचे वतीने सत्कार करण्यात आला.

जिल्हा पोलिस अधिक्षक राजा रामास्वामी यांनी शुक्रवारी जिल्हाभरातील सर्व पोलिस ठाण्यांना भेटी देवून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. परळीतील संभाजीनगर, परळी शहर व ग्रामिण पोलिस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचारी यांचीही त्यांनी बैठक घेतली. पोलिस कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावण्यावर आपण भर देणार असून, कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या मला थेट कळवाव्यात असेही सांगितले. येणाऱ्या काळात बीड जिल्ह्यातील गुन्हे कमी करून घडलेल्या गुन्ह्यांच्या तपासाला जास्तीत जास्त गती देण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशिल रहावे असे आवाहन केले. बैठकीत सर्व पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, हजर होते. संभाजीनगरचे  पो.नि.बाळासाहेब पवार, स.पो.नि.नारायण गिते, पो.उप.नि.संतोष मरळ, चाँद मेंडके, कोरडे, परळी ग्रामीणचे पो.नि.शिवलाल पुर्भे, परळी शहरचे सपोनि एकसिंगे, खरात, आरती जाधव यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार