इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS:पीककर्ज प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार

पीककर्ज प्रक्रिया  ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार



 बीड,  दि. १८--- जिल्हयातील खरीप पिक कर्जासाठी अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांनी एकदाही कर्ज घेतलेले नाही, अशा जुन्या व ज्यांनी कर्ज घेतलेले आहे. व जे पुन्हा कर्ज घेण्यास पात्र आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांनी संबंधीत बँकेकडे खरीप पिक कर्ज मागणीसाठी ३० सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करावेत.जे शेतकरी ३० सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करतील अशा सर्व शेतक-यांचे अर्ज बँकांनी स्विकारावेत. जे बँक व्यवस्थापक अर्ज स्विकारणार नाहीत किंवा स्विकारण्यास टाळाटाळ करतील अशा बॅक व्यवस्थापका विरुध्द कडक कार्यवाही करण्यात येईल. तसेच ज्या शेतकऱ्यांनी व शेतक-यांची माहिती तलाठी व सोसायटी यांच्या मार्फत बँकेला दिलेली आहे. पात्र शेतकऱ्यांचे अर्ज संबंधीत बँकेकडे प्रलंबीत आहेत. अशा बँक व्यवस्थापकांनी पिक कर्जास पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाची कार्यवाही जलद गतीने करावी. यात हयगय करणा-या बँक व्यवस्थापकांवर नियमानुसार कार्यवाही अनुसरन्यात येईल, यांची गंर्भीर नोंद सर्व बँक व्यवस्थापकांनी घ्यावी. असे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे 

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या