इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:परळी मधील प्रिया नगर भागात अंधाराचे साम्राज्य

 परळी मधील प्रिया नगर भागात अंधाराचे साम्राज्य 




परळी वै: दि 22 प्रतिनिधी


परळी शहरातील उच्चभ्रू नागरी वस्ती म्हणून ओळख असलेल्या प्रिया नगर भागात मागील एक महिन्यापासून पथदिवे रात्रीच्या वेळी बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.रात्रीच्या वेळी पादचारी अंधारात चाचपडत आपला मार्ग शोधीत असल्याने पावसाळयात अनेक वेळा पाय घसरून लोटांगण घतल्याच्या घटना घडल्या आहेत.


परळी शहरात लोकसंख्या मोठ्याप्रमाणात वास्तव्य असलेल्या प्रिया नगर हा भाग परळी शहरातील उच्चभ्रू,नोकरदार वर्गाची निवासी वस्ती असलेला भाग असून या भागात नागरिकांची मोठी रहदारी असते. या भागात भगवान विद्यालय ही शाळा देखील असून हा भाग नेहमीच नागरी सुविधा देण्यासंदर्भात दुर्लक्षित राहिलेला आहे.यातच भर म्हणून या भागातील पथ दिवे मागील एक महिन्यापासून बंद आहेत.


रात्रीच्या वेळी या भागातून पायी चालणे मोठया जिकरीचे बनले असून रात्री जसे जंगलातून जात आहोत असे वाटते यातच भर मनुन पाऊस पडल्यावर या भागात अनेक वेळा अंधारात रस्ता न दिसल्याने पादचारी पाय घसरून पडल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

या बाबतीत विद्युत वितरण कपंनीला विचारणा केली असता त्यांनी नगर परिषदेकडे चौकशी करा असे सांगितले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!