इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:देशव्यापी बंद व निदर्शने: किसान सभेचा सिरळसाळयात रास्ता रोको

देशव्यापी बंद व निदर्शने: किसान सभेचा सिरळसाळयात रास्ता रोको 


परळी वै. प्रतिनिधी 

  केंद्र सरकारने ५ जून रोजी जारी केलेले शेतकरीविरोधी विधेयके आणि वीज बिल कायद्यातील बदलाचे अध्यादेश संसदेत पास केलेल्या आहेत. या नवीन बिलांना आणि विधेयकांना मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यासाठी २५ सप्टेंबरला देशव्यापी बंद आणि निषेध निदर्शनाची हाक अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितिच्या वतीने देण्यात आली होती. याचाच एक भाग म्हणून अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शारीरिक अंतर राखून आणि कोविड काळातील सर्व नियमांचे पालन करत सिरसाळा येथील परळी-बीड महामार्गावरील मुख्य चौकात शुक्रवारी दि. 25 रोजी जोरदार निदर्शने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वेळी शेतकऱ्यानी शेतकरी कायदा विरोधी, कामगार कायदा विरोधी घोषणा दिल्या व स्वामिनाथन आयोग लागु करा अशी मागणी केली तसेच शेतकरी विरोधी विधेयकाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. यावेळी किसान सभेचे नेते अॅड.अजय बुरांडे माकप चे ता.सचिव काॅ.गंगाधर पोटभरे, किसान सभा जि.सचिव काॅ.मुरलीधर नागरगोजे, काॅ.बडे सर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. या वेळी किसान सभेचे काॅ.विष्णु देशमुख, काॅ. बालाजी कडभाने, अंकुश उबाळे, आण्णा खडके, भगवान शिंदे, काॅ नवघरे काॅ. मदन वाघमारे, काॅ. प्रकाश उजगरे, काॅ.विशाल देशमुख, काॅ.महादेव शेरकर,काॅ.अनुरथ गायकवाड यांच्यासह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!