MB NEWS: पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांची बदली;राजा रामस्वामी यांची नियुक्ती

 पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांची बदली;राजा रामस्वामी यांची नियुक्ती


बीड, दि.18 (प्रतिनिधी) :  जिल्हा पोलीस अधीक्षकपदी राजा रामस्वामी यांची नियुक्ती केली आहे.गुरुवारी रात्री या संबंधी शासनाने आदेश  काढले आहेत.

          पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या  काळात या जिल्ह्यातील गुन्हेगारांवर मोठा वचक निर्माण केला होता.अट्टल गून्हेगारांविरूध्द मोहिमच राबवली. त्यापैकी बहूतांशी गुन्हेगारांना हद्दपार केले. जिल्ह्यात कायम कायदा व सूव्यवस्था  रहावी यासाठी यशस्वी प्रयत्न केले.त्यामूळेच कोणाही समाजकंटकांनी,उपद्रवी व्यक्तींनी दहशतीपोटी डोकेवर काढण्याचे धाडस केले नाही.पोद्दार यांची प्रसाशनावर मोठी पकड होती.अगदी छोट्या मोठ्या हालचालीवर लक्ष असायचे.पोलिस खात्यात शिस्त असावी यासाठी ते सदैव प्रयत्न करीत. विशेष म्हणजे चांगले काम करणाऱ्यांचे कौतूक,कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी - कर्मचारांविरध्दही  कठोर भूमिका घेतल्या.कामात घोडचूक करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तात्काळ पोलिस नियंत्रण कक्षात बदल्या करित कर्तव्यात कुचराई जमणार नसल्याचे स्पष्ट केले. वेळप्रसंगी काही  कर्मचाऱ्याना निलंबित तर काही कर्मचारी सेवेतुन बदतर्फसुद्धा केले.त्यांच्या जागी आता नवे पोलीस अधीक्षक म्हणून राजा रामस्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !