MB NEWS:सामाजिक बांधिलकी जोपासत भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण, कोराना योध्दाचा सन्मान, मास्क, सॅनिटायझरचे वाटप*

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून कोरोना विरुध्दच्या लढाईत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता लोहितासाठी सर्व सामान्याचे महामारीपासून संरक्षण करण्यासाठी सर्वच कोराना योध्दे म्हणून लढत अशा कोरोना काळात आहोरात्र सेवा देणार्यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान व मास्क सॅनिटायझरचे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जपत साध्यापध्दतीने व सामाजिक उपक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला.
देशासह संपूर्ण जगात सद्यस्थितीत कोरोना विषाणुसंसर्ग आजाराच्या जागतिक महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. व त्यामुळे देशात व राज्यात आपत्कालीन परिस्थती निर्माण झालेली आहे. तथापि कोरोना विरुध्दच्या लढाईत स्वत:च्या जीवाची बाजी लावून लोहितासाठी व सर्वसामान्यांचे महामारी पासुन संरक्षण करण्यासाठी सर्वच कोरोना योध्दे लढत आहे. तेंव्हा ही सर्व आपातकालीन परिस्थती लक्षात घेता भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांच्या वाढदिवस त्यांच्या हितचिंतक व मित्र परिवाराकडून कोरोना योध्दांना समर्पित अशा पध्दतीने साजरा करण्यात आला.
शहरातील श्री साईनाथ मंदिर येथे भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोराना विषाणू संसर्ग आटो्नयात आणण्यासाठी कामाला लागलेल्या कोरोना योध्दांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळी गोपीनाथगड येथे वृक्षारोप करण्यात आले. सफाई कामगारांना व नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. देशांमध्ये कोरोना सारख्या भीषण परिस्थितीशी झुंज देत देशाची खरी सेवा करणार्या कोरोना योध्दांचा यामध्ये डॉ्नटर, पत्रकार, अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान पत्र देऊन सत्कार करुन मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वान करता वार्तांकनासाठी आहोरात्र काम करणार्या लोकशाहीचा चौथास्तंभ पत्रकार बांधव यांचा कोरोना योध्दा सन्मान पत्र व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. कोराना आजारा विरुध्दच्या लढाईत आरोग्य, महसूल, ग्रामपंचायत, पोलिस, होमगार्ड, प्रसिध्दीमाध्यमे या सर्व विभागातील कर्मचारी तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, अशा स्वयंसेविका या सर्वांनी आपल्या जिवाची पर्वान करता आपण स्वत: काळजी घेत समाजाला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी दिवसरात्र अविरत सेवा बजावली त्याबद्दल या सर्व कर्मचार्यांनी व आदींनी केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल कोराना योध्दा म्हूणन सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कोरोना आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन सोशल डिस्टंसिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन मुळे सर्वत्र आर्थिक मंदी असल्याने आपला वाढदिवस थाटामाटात साजरा न करता अत्यंत साधे पणाने साजरा करण्यात आला. तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना प्रत्येक्ष भेटुन तसेच मोबाईल, एसएमएस, व्हाट्सअप आदींच्या माध्यमातुन शुभेच्छा दिल्या. आज सकाळीपासुन रात्री उशीरापर्यंत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतच होता. दरम्यान शुभेच्छा देणार्या सर्वांचे राजेश गित्ते यांनी आभार मानले आहेत. तसेच प्रत्येक नागरिकांनी पर्यावरणाचा र्हास टाळण्यासाठी किमान एक तरी वृक्ष लावावे त्यांचे संगोपन करावे असे आवाहन भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा