मुख्यमंत्री,सहकार मंत्री, साखर संघाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळेच 'वैद्यनाथ' ला मिळाली थकहमी - पंकजा मुंडे
मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने राज्यातील ३२ साखर कारखान्यांना थकहमी मंजूर करण्याचा निर्णय घेतला. कारखान्यांची यादी यापूर्वीच जाहीर झाली होती, या यादीत वैद्यनाथ कारखानाही होता. या कारखान्याला थकहमी मिळावी यासाठी आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, सहकार मंत्री बाळासाहेब थोरात व साखर कारखाना संघाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता, त्याचेच फलित म्हणून सरकारने कारखान्याला १० कोटी ७७ लाख रूपयाची थकहमी देण्याचा निर्णय घेतला आहे, याबद्दल पंकजाताई मुंडे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा