इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी विधेयके रद्द करावे परळी येथे मूव्हमेंट फाॅर पिस अॅन्ड जस्टीस संघटनेच्या सदस्यांची उपजिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

 केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी विधेयके रद्द करावे 



परळी येथे मूव्हमेंट फाॅर पिस अॅन्ड  जस्टीस संघटनेच्या सदस्यांची उपजिल्हाधिकारी यांच्याकडे  मागणी 


परळी (प्रतिनिधी):

 केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा कोणताही विचार न करता घाई गडबडीत तीन शेतकरी विरोधी कृषी विधेयके मंजूर केले. हे सर्व विधेयके शेतकरी विरोधी असून ते रद्द केले पाहिजे या मागणीचे निवेदन राष्ट्रपतींना उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत मूव्हमेंट फॉर पिस अॅन्ड जस्टीस  संघटनेच्या सदस्यांनी दिले. 


 केंद्र सरकारने कृषी विधेयके मंजूर करताना शेतकऱ्यांचे हित पाहिलेले नाही. या विधेयकामुळे शेतकरी खाजगी कंपन्यांचे बाहुले होतील. शेतकऱ्यांना दलालालापासून मुक्ती मिळेल असे सरकार म्हणते, परंतु असे कदापि होणार नाही. उलट शेतकरी या कायद्यामुळे मोठ्या संकटात सापडू शकते. हे विधेयक शेतकऱ्यांना गुलामगिरीत लोटणारे आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करू असे सरकार म्हणते. पण शेतकऱ्यांच्या शेत मालालाच हमी भाव देत नाही. म्हणून हा कायदा सरकारने तात्काळ रद्द करावा अशी मागणी मूव्हमेंट फॉर पिस अॅन्ड जस्टीसच्या परळी येथील सदस्यांनी राष्ट्रपतींना उपजिल्हाधिकारी मार्फत निवेदन देऊन केली. 

 यावेळेस मूव्हमेंट फॉर पिस अॅन्ड जस्टीसचे तालुका अध्यक्ष सय्यद जाफर, बीड जिल्हा सचिव सय्यद  सबाहत अली, शेख हाफिज,  शेख वसीम, शेख मिनहाज, शेख अबरार, शेख अन्वर , शेख जावेद, शेख मुदस्सीर आदी  संघटनेचे सदस्य उपस्थित होते. 


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!