MB NEWS:बीडी उत्पादनावरले संत तुकारामाचे महाराजांचे दिलेले नाव हटवण्याची लेखी मागणी* *महादेव महाराज बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडावाडयात देणार निवेदनं.*

 *बीडी उत्पादनावरले संत तुकारामाचे महाराजांचे दिलेले नाव हटवण्याची लेखी मागणी*


*महादेव महाराज बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडावाडयात देणार निवेदनं.*



अंबाजोगाई ( प्रतिनिधी) 


मागच्या अनेक दिवसांपासून वारकरी संप्रदायाची अस्मिता,कळसस्थान, किंबहूना महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबाराय यांच्या नावाचा व फोटोचा वापर करणाऱ्या बीडी उत्पादन करणाऱ्या निजामाबाद येथील उत्पादक कंपनीवर दंडात्मक कार्यवाहि करुण बिडी वरील नाव हाटवण्याची लेखी मागनीचे निवेदन महादेव महाराज बोराडे यांनी जिल्हाउपाधीकारी अंबाजोगाई यांना दिले आहे.

निजामाबाद येथी बिडी उत्पादक कंपनीने संत तुकाराम महाराजांच्या नावाने हे उत्पादन सुरू केले आहे. सदरील उत्पादकाने संपूर्ण वारकरीच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक जनमनाच्या भावनांचा घोर अपमान केला आहे.श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थानचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे मराठवाडा अध्यक्ष महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या हस्ते  उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय अंबाजोगाई  यांना निवेदन देण्यात आले.यावेळी महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष ह.भ.प.हनुमंत महाराज जगताप, ह.भ.प.बीड जिल्हा प्रचारक ह.भ.प.विनायक महाराज काचगुंडे,अमोल महाराज घोडके, ह.भ.प. हनुमंत महाराज शिरसाठ,पं.स. सभापती प्रा प्रशांत जगताप यांची उपस्थिती होती.निवेदनाद्वारे प्रशासकीय पातळीवर उत्पादन निर्मितीस बंदी आणावी.वितरित केलेल्या संपूर्ण उत्पादनाचा माल ताब्यात घ्यावा,आणि युगपुरुषांच्या अवमान प्रकरणी सदर उत्पादकास कठोरात कठोर शासन करण्याची लेखी निवेदन द्वारे केली आसुन शासणाने तात्तकाळ दखल घ्यावी  महाराष्ट्र वारकरी महामंडळ संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलनाचा करण्याचा इशारा ही निवदनाव्दारे करण्यात आला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार