MB NEWS:एस.टी बसची मोटारसायकलला धडकअपघातात दोन तरूण ठार

 एस.टी बसची मोटारसायकलला धडकअपघातात दोन तरूण ठार



वडवणी

हिवरगव्हण येथे मित्राला मोटरसायकलवर सोडून आपल्या उपळी गावाकडे येत असताना बाबी फाट्याजवळील गतिरोधकवर पाठीमागून येणाऱ्या एसटीबसने जोराची धडक देत मोटरसायकल स्वरांना उडवले अपघात एवढा भीषण होता की दोन्ही तरुण जागीच ठार झाले असल्याची घटना आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान वडवणी तालुक्यातील बाबी फाट्याजवळ घडली असल्याची ची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

  याबाबत अधिक माहिती अशी की,

वडवणी तालुक्यातील उपळी येथील तरुण ऋषिकेश राजु शेळके (वय २३ वर्ष),ओमप्रकाश श्रीमंत राऊत (वय २६ वर्ष) हे आपल्या मोटरसायकलवर हिवरगव्हाण येथील मित्राला सोडुन आपल्या गावी उपळीला येत असताना बाबी फाट्या जवळ असणाऱ्या गतिरोधक जवळ पाठीमागून बीड वरून येणाऱ्या परभणी आगाराची एसटी बस एम एच २० बी.एल ३६१२ क्रमांकांच्या एस टी बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने विना नंबर असलेल्या मोटरसायकल पाठीमागून जोराची धडक दिली यामध्ये ऋषिकेश शेळके व ओमप्रकाश राऊत या दोन्ही तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली आहे जखमी अवस्थेत तरुणांना उपचारासाठी बीड जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. या घटनेची माहिती वडवणी पोलिसांना कळतात उपळी बीट अंमलदार नवनाथ ढाकणे यांनी या घटनेकडे तात्काळ धाव घेतली होती. सदरील या घटनेने उपळी गावात शोककळा पसरली आहे मात्र ही घटना वृत्तसंकलन करेपर्यंत वडवणी पोलीस मध्ये कुठल्या प्रकारचा गुन्हा नोंद झाला नव्हता या घटनेचा अधिक तपास वडवणी पोलीस करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार