MB NEWS:तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; जीवन प्राधिकरणात रूजू होण्याआधीच निघाले आदेश*




----------------------------------- 

*◼️तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; जीवन प्राधिकरणात रूजू होण्याआधीच निघाले आदेश*


----------------------------------- 

मुंबई : नागपूरच्या महापालिका आयुक्तपदावरून बदली करत मुंबई जीवन प्राधिकरणचा कारभार देण्यात आला होता. कोरोनाबाधित असल्याने बरे झाल्यानंतर मुंढे यांनी अद्याप या प्राधिकरणाचे सचिवपद स्वीकारलेले नाही. तोपर्यंत राज्य सरकारने त्यांची पुन्हा बदली केली आहे. 


तुकाराम मुंढे यांना मुंबई जीवन प्राधिकरणाचा कार्यभार देण्यात आला होता. याठिकाणी रुजू होऊ नका, असा संदेश राज्य सरकारने दिला आहे. तर मुंबई जीवन प्राधिकरणचा अतिरिक्त कार्यभार मदत व पुनर्वसनचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे देण्यात आला आहे. याबाबतचे आदेश राज्य सरकारने आज दिले आहेत. एम. जे. प्रदीप चंद्र यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ नागपूर तसेच ई रवींद्रन यांची नियुक्ती सह विक्रीकर आयुक्त, विक्रीकर विभाग, मुंबई या पदावर करण्यात आली आहे. 


तुकाराम मुंढे यांना आता कोणते पद मिळणार ते जाहीर केलेले नाही. त्यांच्याकडे आता कोणती जबाबदारी देण्यात येणार याबद्दल उत्सुकता आहे. तुकाराम मुंढे यांचा नागपुरातील कार्यकाळदेखील वादग्रस्तच राहिला. लोकप्रतिनिधींनी सातत्याने त्यांच्याविरोधात भूमिका घेतली. इतकेच काय तर त्यांच्यावर ‘हुकूमशहा’ अधिकारी अशीदेखील टीका करण्यात आली. दुसरीकडे ‘कोरोना’ संसर्गासंदर्भात मुंढे यांनी सुरुवातीच्या काळातच तातडीची पावले उचलली होती. त्यामुळे सुरुवातीची चार महिने नागपुरात ‘कोरोना’चा संसर्ग नियंत्रणात राहिला होता. मागील काही काळापासून मुंढे विरुद्ध लोकप्रतिनिधी हा संघर्ष पेटला होता. नागपुरचे महापौर संदीप जोशी यांनीदेखील मुंढे यांच्याविरोधात भूमिका घेतली होती. 

टिप्पण्या

  1. कदाचित साहेब pmo कार्यालयात जातील तिथेच अशा अधिकार्याची आज गरज आहे

    उत्तर द्याहटवा
  2. तुकाराम मुंढे एक बहादर सनदी अधिकारी आहेत. बीड जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. PMO त जाऊ शकतात.

    उत्तर द्याहटवा
  3. त्यांना ग्रहमंञी करा तिच जागा योग्य असेल त्यांच्यासाठी

    उत्तर द्याहटवा
  4. त्यांना ग्रहमंञी करा तिच जागा योग्य असेल त्यांच्यासाठी

    उत्तर द्याहटवा
  5. जो काम करतो त्याला भिती नसते तो नेहमी फिट असतो उत्तर द्या.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार