MB NEWS:कंगना वादात आता राज्यपालांचीही उडी, राज्यसरकारवर नाराजी

 *⭕कंगना वादात आता राज्यपालांचीही उडी, राज्यसरकारवर नाराजी


⭕*


  मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत प्रकरणी राज्यपालांनीही नाराजी व्यक्त केली आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांना राज्यपालांनी राजभवनवर बोलवून घेतलं. राज्यपालांनी अजोय मेहता यांच्याशी कंगना रानौत हिच्या घरावर झालेली कारवाई आणि या प्रकरणी सरकारची भूमिका याबाबत झाली चर्चा केली. 


   अजोय मेहता आणि राज्यपाल या दोघांमध्ये बुधवारी चर्चा झाली. या प्रकरणात सरकारने घेतलेल्या भूमिकेबद्दल राज्यपालांनी अजोय मेहता यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळाली आहे. कंगना वादात आता राज्यपालांनीही उडी घेतली असून राज्यसरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. 


   कंगनाने मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण पेटलं. शिवसेना खासदार संजय राऊतांनी कंगनाला मुंबईत न येण्याचा सल्ला दिला. यावर कंगनाने ट्विट करत आपण ९ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असल्याचं म्हटलं. या वादानंतर कंगनाला केंद्र सरकारकडून Y सुरक्षा देण्यात आली. 

    बुधवारी महानगपालिकेने कंगनाचं कार्यालय अनधिकृत असल्याचं म्हणत त्यावर कारवाई केली. कंगनाने मुंबईत नसताना तिच्या कार्यालयावर केलेल्या कारवाईमुळे कंगनाचे वकील उच्च न्यायालयात गेले तेथे त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला. आज ३ वाजेपर्यंत या कारवाईला स्थगिती देण्यात आली. 


  या सगळ्या प्रकरणात राज्य सरकारवर जोरदार टीका झाली. सरकारने सूडबुद्धीने ही कारवाई केल्याचं म्हटलं. यातंच कंगनाने मुंबईत येताच एक व्हिडिओ ट्विट केला. यात मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला. यानंतर हा वाद सुरूच आहे. हे प्रकरण शमण्याचं काही नाव घेत नाही.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !