MB NEWS:*◼️LPG सिलेंडरवर या महिन्यातही नाही मिळणार सबसिडीची रक्कम*

 

*◼️LPG सिलेंडरवर या महिन्यातही नाही मिळणार सबसिडीची रक्कम*



नवी दिल्ली, 02 सप्टेंबर : या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये देखील सरकारकडून मिळणारी सबसिडी (Domestic Gas Subsidy) देण्यात येणार नाही आहे. तुमच्या लक्षात आले असेल की गेल्या 4 महिन्यात तुमच्या खात्यामध्ये Gas Subsidy चे पैसे आले नाही आहेत. सरकारने गॅस सिलेंडरवर मिळणारी सबसिडी मे महिन्यापासून रद्द करण्यात आली आहे. असा निर्णय का घेण्यात आला असावा हा प्रश्न सामान्यांना पडला आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात एप्रिल महिन्यात एलपीजीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली, त्यामुळे मे महिन्यात घरगुती सिलेंडरचे बाजार मुल्य 162.50 रुपयांनी कमी करून 581.50 रुपये करण्यात आले. ज्यानंतर सबसिडी आणि बिना सबसिडीच्या सिलेंडरची किंमत सारखीच झाली. दरम्यान सप्टेंबर महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.


*◼️खात्यामध्ये का येत नाही आहे LPG घरगुती गॅसच्याच्या सबसिडीची रक्कम?*


इकॉनॉमिक टाइम्समधील बातमीनुसार, केंद्र सरकारने मे महिन्यापासून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीमध्ये बदल केला आहे. हा बदल करतानाच सरकारने सबसिडी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. ज्यामुळे मे, जून आणि जुलै मध्य गॅस सिलेंडर घेतल्यानंतर ग्राहकांना सबसिडीचे पैसे ट्रान्सफर केले नाहीत.


दरम्यान गॅस सिलेंडरचे बाजार मुल्य तसंच सबसिडी नसणाऱ्या सिलेंडरची किंमत देखील कमी झाली आहे. तर सबसिडी असणाऱ्या सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. अशावेळी दोन्ही प्रकारच्या सिलेंडरच्या किंमतीतील अंतर जवळपास संपले आहे. त्यामुळेच सरकारन आता घरगुती गॅसवर सबसिडी देणे बंद केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार