MB NEWS:या राज्यातील शाळेची घंटा वाजताच 27 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा*

 *⭕या राज्यातील शाळेची घंटा वाजताच 27 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा*                    

   -----------------------------------  



    हैद्राबाद-  कोरोनाचा प्रादुर्भावामुळे मार्च महिन्यात शाळा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र आता अनलाॅक पाचमध्ये केंद्र सरकारने शाळा सुरु करण्यास परवानगी दिली. त्या परवानगीने आंध्र प्रदेशमधील शाळा सुरु करण्यात आल्या. मात्र शाळा सुरु करताच आंध्र प्रदेशमध्ये 27 शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून तातडीने शाळा बंद करण्यात आली आहे.  आंध्र सरकारने 5 ऑक्टोबरपासून शाळा उघडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु कोरोनाचे संकट वाढल्याने सकारने 2 नोव्हेंबरपासून शाळा उघडण्याचा निर्णय घेतला. विजयनगर जिल्ह्यात दोन जिल्हा परिषद शाळेतील 9 वी आणि 10 वीच्या 27 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे विद्यार्थी आपल्या शंकांचे निरसन करण्यासाठी शाळेत येत होते.त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे पालक चिंतेत आहेत आणि त्यांनी शिक्षक आणि अधिकार्‍यांना धारेवर धरले आहे. पण विद्यार्थ्यांना बाहेरून कोरोनाची लागण झाल्याचा दावा अधिकार्‍यांनी केला आहे. शाळेत सर्व प्रकारची काळजी घेतली जात होती असे अधिकार्‍यांनी म्हटले आहे. तसेच शाळेत येण्यापूर्वी प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी केली जात होतीअसेही अधिकार्‍यांनी नमूद केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार