MB NEWS:*पिक नुकसानीचे पंचनामे 48 तासात पूर्ण करण्याचे निर्देश--- मंत्री अमित देशमुख*

 *पिक नुकसानीचे पंचनामे 48 तासात पूर्ण करण्याचे निर्देश--- मंत्री अमित देशमुख*


*खांडवी येथे शेतात जाऊन केली पाह




बीड, (जिमाका) दि. २०::--राज्यात अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून अजूनही पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. या नुकसानीचे पंचनामे 48 तासात पूर्ण करून प्रस्ताव सादर राज्य शासनास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी केले.


गेवराई तालुक्यातील खांडवी येथे भेट देऊन मंत्री श्री अमित देशमुख यांनी मुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, माजी आमदार अमरसिंह पंडित, राजकिशोर मोदी, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, तहसीलदार सचिन खाडे आदी उपस्थित होते. 


वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री देशमुख म्हणाले, परतीच्या पावसामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे बराच ठिकाणी 130 ते दोनशे टक्क्यापर्यंत जास्त पाऊस झाल्याने शेत पिकांबरोबरच खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे देखील राज्यात नुकसान झालेले आहे यासाठी केंद्र सरकार कडून मदत व्हावी म्हणून प्रस्ताव पाठविण्यात आले असून राज्य सरकार शेतकऱ्यांना या नुकसानी मध्ये मदत करण्यासाठी पुढे आलेले आहे राज्य शासनाने गांभीर्याने अतिवृष्टीच्या नैसर्गिक आपत्ती कडे पाहताना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली आहे असे मंत्री महोदय म्हणाले

        ते म्हणाले, तातडीची मदत करण्याची होणारी मागणी विचारात घेता मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत राज्य शासन निर्णय घेतला जाईल. तसेच नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारला देखील सादर करण्यात येईल, असे मंत्री श्री देशमुख यांनी सांगितले.



*खांडवी येथे शेतात जाऊन मंत्री देशमुख यांनी केली पाहणी*

गेवराई तालुक्यातील खांडवी येथे आज वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी वसंत हरिभाऊ शिंदे या वयोवृद्ध शेतकऱ्यास धीर दिला यावेळी त्यांच्या कापसाच्या शेतात साचलेल्या पाण्यामुळे हातात आलेले पीक वाया गेल्याची भावना शेतकरी शिंदे यांनी बोलून दाखविली. तसेच यावेळी तूर आणि सोयाबीन ही पिके देखील अति पावसामुळे वाया गेल्याचे त्यांना दिसून आले.

००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !