MB NEWS:शासनाच्या सर्व लाभार्थी योजनेसाठी जेष्ठ वयोमर्यादा65वरून 55करावी -प्रेमनाथ कदम

 शासनाच्या सर्व लाभार्थी योजनेसाठी जेष्ठ वयोमर्यादा65वरून 55करावी -प्रेमनाथ कदम .   

         


सामाजिक न्यायमंत्री ना.मुंडेना निवेदन द्वारे  मागणी


परळी (प्रतिनिधी) राज्यातील जेष्ठ नागरिकांना शासनातर्फे विविध योजनेव्दारे लाभ दिला जातो व त्यासाठीजेष्ठ नागरिकांचे वय 65 वर्ष ठरवले गेले आहे मात्र हि वयोमर्यादा जाचक असुन याचा फटका राज्यातील असंख्य 55 वर्ष वय असणाऱ्यां जेष्ठ नागरिकांनां बसत असुन शासनाने सर्व योजनेचा लाभाची वयोमर्यादा 55वर्ष करावी अशी मागणी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या कडे दिनांक 11/10/2020 रोजी एका निवेदनाव्दारे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार प्रेमनाथ कदम यांनी केली आहे.


महाराष्ट्र सरकारने राज्यातील अनेक गरजवंत घटकासाठी विशेष सहाय्य योजना सुरू केल्या असुन त्यात जेष्ठ नागरिकांसाठी असलेल्या श्रावणबाळ योजना,संजय गांधी निराधार योजना व महाराष्ट्र राज्य परिवहनच्या बसने प्रवासात सवलत योजनेचा लाभ घेणाऱ्यालाव65 वर्ष ठेवली आहे.आजच्या धकाधकीच्या काळात खाण,पान,व राहणीमानाचा परिणाम जिवनावर होत असल्याने नागरिकांचे आयुष्यमान कमी होत आहेम्हणुन 65वर्षा नंतर शासनाच्या या योजनेचा लाभ जेष्ठ नागरिकांना घेण्यास जाचक ठरत आहे. 

या विषयावर मागील सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी विधानसभेत जेष्ठांचे वय 65वर्षाहुन 60 वर्ष करण्यात येत असल्याची घोषणा केली होती मात्र या 60 वर्ष वय असणाऱ्या जेष्ठ नागरिकांना श्रावणबाळ योजना,  संजय गांधी निराधार योजना वबस भाड्यात सवलत योजनेतुन मिळणाऱ्या लाभापासुन वगळण्यात आले होते.

यासाठी 55वर्ष वय असणाऱ्यांना जेष्ठ नागरिक घोषीत करून त्यांना शासनातर्फे मिळणाऱ्या श्रावणबाळ योजना ,संजय गांधी निराधार योजना व बस प्रवासात बस भाड्यात सवलत तसेच इतर मिळणाऱ्या लाभाचें लाभार्थी बनवावे अशा मागणीचे निवेदनराज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांना सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार प्रेमनाथ कदम यांनी समक्ष दिले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !