दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS:परळीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई:१० लाखांची लाच स्विकारताना वैद्यनाथ बॅंकेचे चेअरमन चतुर्भुज

 परळीत अॅन्टिकरप्शन विभागाची मोठी कारवाई!

परळीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई:१० लाखांची लाच स्विकारताना वैद्यनाथ बॅंकेचे चेअरमन चतुर्भुज
परळी वैजनाथ, प्रतिनिधी
    बॅंकेतून कर्ज मंजूर केल्याचा मोबदला म्हणून दहा लाख रुपयांची लाच स्विकारताना परळीतील वैद्यनाथ अर्बन को आॅप बॅंकेच्याचेअरमनला रंगेहाथ पकडण्यात आले आहे.परळीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
 कळंब येथील एका किराणा व्यापार्याला कर्ज मंजूर केल्याचे प्रकरण असुन  तक्रारदार यांचे सन 2018 मध्ये सी सी अकाउंट चे अडीच कोटी रुपये कर्ज मंजूर केल्याचा मोबदला म्हणून तक्रारदार यांचेकडे रु. 15,000,00/-  मागणी करून, रु.10,000,00/- ही प्रत्यक्ष स्वीकारून उर्वरित रू.5,000,00/-  नंतर घेण्याचे सांगितले.ही लाचलाचलुचपत प्रतिबंधक विभाग युनिट- औरंगाबादने  स्विकारताना चेअरमन अशोक जैन यांना ताब्यात घेण्यात आले आहे.सापळा अधिकारी-श्री. गणेश धोक्रट, पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि.औरंगाबाद. श्री पोना. विजय बाम्हंदे, सुनील पाटील,  मिलिंद इप्पर,  पोशि. विलास चव्हाण,  चागंदेव बागुल, ला. प्र. वि. औरंगाबाद मार्गदर्शक-मा. डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, मा.डाॅ. अनिता जमादार, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. औरंगाबाद. यांनी ही कारवाई केली आहे.


टिप्पण्या

  1. मी सतीश कांदे गाव अस्वलआबा आबुलेश वाले लुटकरतात परळीतुन अंबाजोगाई ला भाडे सात हजार रुपये घेतात

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट