MB NEWS:चंद्रभागेच्या तिरावर नव्याने बांधण्यात आलेला घाट खचला ;नागरीक दबले(Reporter- Rameshwar Nanware))

 चंद्रभागेच्या तिरावर नव्याने बांधण्यात आलेला घाट खचला;चार ते पाच नागरीक दबले: मदतकार्य सुरू



पंढरपुर, प्रतिनिधी....


पंढरपुरातील चंद्रभागा नदीकडेला असलेला नव्याने बांधण्यात आलेला घाट खचला असून त्यामध्ये चार ते पाच नागरिक दबले गेले आहेत.दरम्यान, दबलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी भर काढण्यात येत आहे.या घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर घटनास्थळी पोहोचले आहेत.पंढरपूर शहरातील विविध झोपडपट्ट्यांमधील घरांमध्ये शिरले पावसाचे पाणी पंढरपूर तालुक्यांमध्ये काल रात्रीपासून संततधार पाऊस पडत असल्याने पंढरपूर शहरातील विविध झोपडपट्ट्यांमधील घरांमध्ये पाणी घुसले आहे.


महसूल प्रशासनाने दिनांक 13 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र मध्ये पावसाच्या अतिवृष्टीचा इशारा दिला असून काल रात्रीपासून सुरू झालेला पाऊस आज दुपारी साडे तीन पर्यंत कसलाच न थांबल्यामुळे पंढरपूर शहरातील अनिल नगर आणि विविध भागातील इतर झोपडपट्ट्यांमध्ये ही गोरगरिबांच्या घरामध्ये पाणी घुसले असल्याने त्यांचे कौटुंबिक जीवन विस्कळीत झाले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !