MB NEWS:परळीची जलसंजीवनी असलेला वाण प्रकल्प भरल्याने समाधानी* *धनंजय मुंडे यांनी वाण धरणावर केले जलपूजन*

 *परळीची जलसंजीवनी असलेला वाण प्रकल्प भरल्याने समाधानी*


 *धनंजय मुंडे यांनी वाण धरणावर केले जलपूजन*




*जायकवाडीचे पाणी आणणे हे आपले ध्येय - धनंजय मुंडे*


परळी (दि. १०) ---- : परळी शहरासह तालुक्याची जलसंजीवणी असलेले वाण धरण जवळपास चार वर्षानंतर पूर्ण क्षमतेने भरले असून यामुळे तालुक्याची तहान भागणार असून सिंचनासाठीही मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने समाधान वाटत असल्याचे परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. 


वाण धरणाच्या तीरावर ना. मुंडेंच्या हस्ते विधिवत जलपूजन संपन्न झाले व आरती करण्यात आली; यावेळी आ. संजय दौंड, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड, जि. प. गटनेते अजय मुंडे, युवक नेते अभय मुंडे, दिपक नाना देशमुख, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, शरदभाऊ मुंडे, भाऊड्या कराड, मोहन सोळंके, सूर्यभान मुंडे, उपसभापती पिंटू मुंडे, अंबाजोगाईचे सभापती प्रशांत जगताप , रवी मुळे, विनोद जगतकर, वैजूअण्णा बागवाले, नाथ प्रतिष्ठानचे सचिव नितीन मामा कुलकर्णी, तहसीलदार विपीन पाटील, न.प. मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद मुंडे, जलसंपदा विभागाचे अभियंता सिरसाट, गुलभिले यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.


यावर्षी वाण धरण भरल्याने  परळी व परिसरातील गावांच्या  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न  संपला असला तरी  भविष्यात  दुष्काळामुळे  वान धरण कोरडे पडल्यास  परळी शहराला पाणी टंचाई भासू नये यासाठी नाथरा फाटा येथून जाणाऱ्या माजलगाव कालव्याला पाईपलाईन करून जायकवाडी चे पाणी वाण धरणात आणणे हा आपला प्रयत्न असून, यासाठी जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांच्या सोबत नुकतीच एक बैठक घेतली आहे. 


वाण धरणासाठी जायकवाडी चे पाणी आरक्षित करण्यात यावे याबाबतही आपण मागणी केली असून, हे पूर्ण झाल्यास परळीचा पाणीप्रश्न कायमचा मिटेल असेही यावेळी बोलताना ना. मुंडे म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार