MB NEWS:मराठा आरक्षणाचा मुळ विषय बाजुला करुन सरकार पळवाट काढतय का?- शिवाजी शिंदे

 मराठा आरक्षणाचा मुळ विषय बाजुला करुन सरकार पळवाट काढतय का?- शिवाजी शिंदे



*दा.वडगावचे साखळी धरणे चौथ्या  सुरुच*


परळी वै....

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजेत या मुळ मागणीसाठी संपुर्ण समाज रस्त्यावर उतरलेला संपुर्ण देशाने पाहिला.याची नोंद जागतिक स्तरावरही झाली परंतु सरकार मराठ्याच्या मुळ आरक्षणाच्या मागणीला बगल देत असल्याचे दिसुन येत आहे.सुप्रिम काॕर्टाने मराठा आरक्षणावर जी स्थगिती दिली ती कशी उठवता येईल हे न पाहता इतर गोष्टी पुढे करुन वेळकाढु पणा करत असल्याचा आरोप दा.वडगाचे शिवाजीराव शिंदे यांनी केला.

परळी तालुक्यातील मौजे दा.वडगाव येथे गेल्या चार दिवसा पासुन गावकरी साखळी धरणे आंदोलन करत आहेत.दा.वडगावच्या अकरा विद्यार्थ्यांनी एसईबीसी च्या कोट्यातुन परिक्षा दिल्या ते पाञ ही झाले आॕर्डर ही मिळणार होत्या परंतु आरक्षणाच्या स्थगितीमुळे हे पाञ विद्यार्थ्यांचे काय करायचे असा सवाल गावकरी उपस्थित करित आहेत.आमचा मुळ प्रश्न मराठा आरक्षणाचा असताना वेळ काढु पणा करत राज्य सरकारने ख-या अर्थाने mpsc च्या परिक्षा रद्द करुन पुन्हा एकदा प्रश्न निर्माण केला आहे.हे पाञ ठरलेले अकरा विद्यार्थी सामान्य कुटुंबातील असुन काही विद्यार्थींचे नौकरीसाठी लागणाऱ्या  वय निघुन जात आहे म्हणुन संपुर्ण गाव या साखळी धरणे आंदोलनात राञंदिवस सहभाग नोंदवत आहे.जो पर्यत आरक्षण मिळणार नाही तो पर्यत हे आंदोलन चालुच राहणार असल्याचे आंदोलक सांगत आहे.

यावेळी शिवाजी शिंदे,भास्कर शिंदे, पद्मजा शिंदे पूजा शिंदे,स्वाती आमले अदीनी आपली मनोगत व्यक्त केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार