परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
साठ हजार किंमतीची अवैध दारू संभाजीनगर पोलिसांनी पकडली
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
बाराशे लिटर दारू अवैधरीत्या अॅटोमध्ये वाहतूक करताना परळी शहरात संभाजी नगर पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपी व वाहनाला ताब्यात घेतले आहे.
आज दिनांक 12 रोजी सकाळी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलाखाली मोंढा परिसरात एका अॅटोची पोलिसांनी तपासणी केली असता यामध्ये दारू वाहतूक होत असल्याचे आढळून आले. यासंबंधाने धडक कारवाई करत पोलीसांनी दीड लाखाचा ऐवज जप्त केला. संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे. काॅ. भताने, पोलीस नाईक दत्ता गित्ते ,अर्जुन राठोड, पो.हे. मोहन दुर्गे यांनी ऑटो सह दारू जप्त केली.जप्त करण्यात आलेल्या दारूची अंदाजे किंमत 60 हजार रुपये असून अॅटोसह एकूण दीड लाखाची पोलीस कारवाई करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपी व ऑटो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. अधिक तपास संभाजीनगर पोलिस करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा