MB NEWS:माणिकराव पाळवदे यांचे निधन प्रा.नारायण पाळवदे यांना पितृशोक

 माणिकराव पाळवदे यांचे निधन 



प्रा.नारायण पाळवदे यांना पितृशोक 



परळी वैजनाथ (प्रतिनीधी) :- 

 परळी तालुक्यातील जेष्ठ राजकिय सामाजीक व्यक्ती हेळंब सेवा सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन माणिकराव पाळवदे यांचे आज दि.27 रोजी पहाटे चार वाजता निधन झाले.वैद्यनाथ महाविद्यालयातील प्रा.नारायण पाळवदे, प्रा.नागोराव पाळवदे, हेळंबचे उपसरपंच राम पाळवदे यांचे ते वडील होते.

 परळी तालुक्यातील हेळंब येथील रहिवासी माणिकराव पाळवदे हे हेळंब व परिसरात अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणुन ओळखले जायचे गावच्या विकासात,ग्रामस्थांच्या सुख दुःखात सहभागी होवुन हेळंब गावचा विकास साधला. उपसरपंच, सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन व अनेक वर्षे संचालक म्हणुन काम करताना असंख्य शेतकर्यांच्या समस्या सोडवल्या वयाच्या 92 व्या वर्षी आज मंगळवार दि.27 ऑक्टोबर रोजी पहाटे चार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. तीन मुले व दोन मुली सुना,नातवंडे पणतु असा परिवार असुन परळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महादेव गित्ते यांचे ते आजोबा होते.त्यांच्या पार्थिवावर आज दि.27 रोजी हेळंब येथे दुपारी 3 वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार