MB NEWS:राज्यातील शाळा सुरू होण्याचे शिक्षण विभागाचे संकेत

 राज्यातील शाळा सुरू होण्याचे शिक्षण विभागाचे  संकेत





मुंबई :


राज्यातील शासकीय, खासगी, अनुदानित व विनाअनुदानित शाळा सुरू करण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. सुमारे ५० टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ऑनलाईन शिक्षणाशी संबंधित कामासाठी तात्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्याबरोबरच शाळा २ ते ३ वेळेस निर्जंतुकीकरण, पालकांच्या लेखी संमतीनेच मुलांना शाळेत प्रवेश तसेच अध्यापन साहित्य व संगणकांचे निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश देत राज्य सरकारने राज्यातील सर्व शाळा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.



राज्यात कोविडच्या प्रादुर्भावामुळे शाळा प्रत्यक्षात सुरू करणे शक्य नाही. यामुळे स्थानिक परिस्थितीनुसार शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात यावेत. हे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त व शाळा व्यवस्थापन समिती यांना प्रदान करण्यात आले आहेत. काही ठिकाणी प्रत्यक्षात शाळा सुरू करता आल्या नाहीत. विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी पूर्वप्राथमिक ते इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले आहे.


आता प्रवासाची सार्वजनिक वाहने सुरू झाल्यामुळे राज्य शासनाने सर्व शाळांमधील ५० टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ऑनलाईन कामासाठी तत्काळ रुजू होण्याचे आदेश गुरुवारी (दि.२९) दिले आहेत. जे शिक्षक गाव व शहरापासून प्रवास करून येतात, त्यांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्था न वापरता वैयक्तिक वाहन वापरून शाळेत येण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.


जे शिक्षक लोकल ट्रेन, बस व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतात त्यांनी मास्क व शारीरिक अंतराबाबतचे नियम पाळावेत. तसेच तोंडाला हात लावू नये,  शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शाळेच्या प्रवेशद्वारावर तपासणी, कर्मचाऱ्यांना मास्ती सक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.


शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळेच्या परिसरात वावरताना किमान सहा फूट शारीरिक अंतर ठेवून वापरण्यास मुभा देण्यात आले आहे. शाळेमध्ये हात स्वच्छ धुण्यासाठी साबण व स्वच्छ पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश शाळा प्रशासनाला दिले आहेत. शाळेतील स्वच्छतागृहांचे निर्जंतुकीकरण वारंवार करण्यात यावे तसेच शाळेच्या परिसराचे दिवसातून किमान एक वेळ स्वच्छता व निर्जंतुकीकरण करावे. कुटुंबातील कोणी कोविड अबाधित असल्यास त्यांनी शाळेत येऊ नये, चिंता आणि निराशा सारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या असणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी समुपदेशन करण्याची व्यवस्था करावी इत्यादी सूचना आज शालेय शिक्षण विभागाने करत शाळा सुरु करण्याचे संकेत दिले आहेत.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !