MB NEWS:धनंजय मुंडे अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची करणार बांधावर जाऊन पाहणी*

 *धनंजय मुंडे अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची करणार बांधावर जाऊन पाहणी*



*रविवारी गेवराई, माजलगाव आणि वडवणी तालुक्याचा करणार दौरा*


बीड (दि. १७) ---- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे हे रविवारी (दि. १७) बीड जिल्ह्यात दौरा करून अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी करणार आहेत. 


रविवारी ना. मुंडे हे सकाळी 10 वाजेपासून गेवराई तालुक्यातील हिरापुर, इटकुर, मादळमोही, मिरकाळा, नंदपूर आदी गावांमध्ये प्रत्यक्ष बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. यावेळी ना. मुंडे यांच्यासह माजी आ. अमरसिंह पंडित, महसूल, कृषी आदी विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत.


गेवराई नंतर दुपारी 1 वाजल्यापासून माजलगाव व वडवणी तालुक्यातही ना. धनंजय मुंडे हे आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्यासह माजलगाव तालुक्यातील तालखेड, फुलेपिंपळगाव, नित्रुड, वडवणी तालुक्यातील मोरवड, पुसरा आदी गावांमध्ये प्रत्यक्ष शेतावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करतील. 


बीड जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले असून, राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना दिलासा मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, त्यादृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करत असल्याचे ना. मुंडे यांनी म्हटले आहे. 


सोमवार (दि. १९) राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार हे देखील गेवराई, बीड आदी तालुक्यांचा देखील दौरा करून पाहणी करणार आहेत. तर मुंडे हे पुढील दिवसात उर्वरित तालुक्यातही पाहणी करणार आहेत.


सरकारचा एक प्रतिनिधी व जिल्ह्याचा एक नागरिक या नात्याने अशा कठीण प्रसंगी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून सर्वतोपरी मदत करण्याची आपली भूमिका असल्याचे यापूर्वीही ना. मुंडे यांनी म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !