MB NEWS:अट्टल मोटारसायकल चोर जेरबंद; जिल्हा व जिल्ह्याबाहेर चोरी केलेल्या ९मोटारसायकली हस्तगत

 अट्टल मोटारसायकल चोर जेरबंद; जिल्हा व जिल्ह्याबाहेर चोरी केलेल्या ९मोटारसायकली हस्तगत



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

   मोटारसायकल चोरी करून त्या विक्री करणार्या एका अट्टल मोटारसायकल चोराला जेरबंद करण्यात परळी पोलीसांच्या डीबी शाखेच्या पोलिस पथकाला यश मिळाले आहे.या चोराकडून जिल्हा व जिल्ह्याबाहेर चोरी केलेल्या ९ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.

    याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, परळी शहरात तहसील समोरील मैदानावरुन शेख शाहेद वाजेद यांची मोटारसायकल चोरीला गेली होती.याबाबतचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल आहे.या गुन्ह्यात तपास सुरू असताना गुप्त माहिती मिळाल्यानंतर संशयित म्हणून मरळवाडी ता.परळी येथील राहणार आरोपी राजाभाऊ रतन ताटे यास चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने मोटारसायकल चोरी केल्याचे मान्य केले.अधिक तपास केला असता त्याने बीड जिल्ह्यात व अन्य नाशिक, जळगाव, पुणे येथे ही चोर्या केल्याचे त्याने कबुल केले.तसेच चोरी करून आणलेल्या मोटारसायकली विक्री ला ग्राहक मिळाले नाही त्यामुळे मरळवाडी  शिवारात झाडा झुडुपांमध्ये लपवून ठेवल्याचे उघड झाले.पोलीसांनी वेगवेगळ्या कंपनीच्या ९ गाड्या हस्तगत केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या गाड्यांची किंमत सुमारे ३लाख ६० हजार इतकी आहे.

      ही कामगिरी पोलीस अधीक्षक, उपाधिक्षक, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रदीप एकसिंगे,पोहवा भास्कर केंद्रे, पोहवा तोटेवाड,पोहवा घुमरे,पोहवा चव्हाण,पोना हनुमान मुंडे, पोना सुंदर केंद्रे,पोशि गोविंद भताने,पोशि शंकर बुट्टे,अन्नमवार यांनी केली आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !