MB NEWS:निधनवार्ता-माकपचे काॅ. बाबासाहेब सरवदे यांचे दुखःद निधन*

 *माकपचे काॅ. बाबासाहेब सरवदे यांचे  निधन*




अंबाजोगाई. प्रतिनिधी 


   माकपचे जेष्ठ नेते काॅ. बाबासाहेब सरवदे यांचे रविवारी सायंकाळी साडेसात वाजता अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात निधन झाले. मागील वर्षभरापासून कर्करोगाशी झुंज देत होते. 

    विद्यार्थी दशेपासुन एसएफआय या संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर अनेक आंदोलनाचे नेतृत्व केले. शेतकरी, शेतमजूरांच्या प्रश्नावर सतत सक्रीय राहुन त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे काम काॅ. बाबासाहेब सरवदे यांनी केले आहे. जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी काॅ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या विचाराचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. शेतमजूर संघटनेवर त्यांनी अनेक वर्षे काम केले. शेतमजूर युनियनचे राज्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा येथे झाले होते. मागील पंधरा वर्षांपासून पासुन त्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम पहात होते.  

काॅ. बाबासाहेब सरवदे हे मागील एक वर्षा पासुन कर्करोगाशी झुंज देत होते. रविवार दि. 18 रोजी सायंकाळी साडेसात वाजता अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 60 वर्ष होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा, जावई व नातु असा परिवार आहे. काॅ. बाबासाहेब सरवदे यांच्यावर सोमवारी (ता. 19) सकाळी नऊ वाजता अंबाजोगाई येथील लालनगर येथील स्मशानभूमीत करण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !