MB NEWS: "उमेद'' अभियान ही लाखो महिलांची उमेद ; हे अभियान सशक्त करणे गरजेचे पण ' उमेद माउलीला' पावसात आंदोलनाची वेळ - पंकजाताई मुंडे

  "उमेद'' अभियान ही लाखो महिलांची उमेद ; हे अभियान सशक्त करणे गरजेचे पण ' उमेद माउलीला' पावसात आंदोलनाची वेळ - पंकजाताई मुंडे



परळी वैजनाथ,प्रतिनिधी......."

  "उमेद'' ही लाखो महिलांची उमेद ; हे अभियान सशक्त करणे गरजेचे पण ' उमेद माउलीला' पावसात आंदोलनाची वेळ आली आहे हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया पंकजाताई मुंडे यांनी दिली आहे.

  उमेद अभिमानातील महिलांचे आंदोलन सुरू आहे.पावसात हे आंदोलन झाले यावर ट्विट करून माजी ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.त्यांनी म्हटले आहे की, "उमेद'' अभियान ही लाखो महिलांची उमेद आहे.. ग्रामीण भागात महिला स्वयंपूर्ण होऊन त्यांना आर्थिक ताकत देण्याचं काम यातून झालं आहे.. महिला पोषण, शिक्षण, स्वच्छता, बँक व्यवहार आणि सामुदायिक जवाबदारी शिकली आणि सशक्त बनली ते "उमेद" मुळे.

समाज उत्थान व महिला सक्षमीकरण साधणारे हे अभियान, या सरकारने सशक्त करायला पाहिजे.. बचतगट चळवळ ही सुदृढ करावी.. पण दुर्दैव की त्या "उमेद" च्या माउलीला कोरोना च्या गंभीर परिस्थितीत पावसात आंदोलन करावं लागत आहे. 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !