इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:आज ६ वा दिवस:मराठा आरक्षणासाठी दादाहरी वडगाव चे धरणे रा.काॅ.नेते तुळशीराम पवार यांनी भेट देऊन घेतला सहभाग

 आज ६ वा दिवस:मराठा आरक्षणासाठी दादाहरी वडगाव चे धरणे 



रा.काॅ.नेते तुळशीराम पवार यांनी भेट देऊन घेतला सहभाग

परळी l प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव येथे बेमुदत साखळी पद्धतीने आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे. गावातील महिला, लहान मुले, तरुण आणि जेष्ठांचाही यात उत्स्फूर्त सहभाग आहे. आज आंदोलनाचा ६ वा दिवस असून जोपर्यंत मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत अखंडपणे हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय सर्वमुखी घेण्यात आला आहे.


आरक्षणासह विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायत समोर साखळी पद्धतीने ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे.  सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला दिलेली स्थगिती कशी उठवणार? पूर्वी मिळालेल्या आरक्षणातून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रवेश अर्ज केलेले आहेत त्यांना तात्काळ प्रवेश देण्यात यावा, नोकर भरतीमध्ये शासनाने आरक्षणाप्रमाणे तात्काळ नियुक्ती आदेश द्यावेत, न्यायालयातील अंतरिम स्थगिती उठेपर्यंत नोकरी व शिक्षणातील आरक्षणाला अबाधित ठेवावे, स्थगिती उठेपर्यंत कोणतीही भरती शासनाने जाहीर करू नये, शासकीय पोर्टलच्या लिंकमध्ये वारंवार प्रगती अहवाल जाहीर करावा आशा विविध मागण्या आंदोलकांच्या वतीने करण्यात आल्या आहेत. जोपर्यंत मराठा समाजाच्या या जिव्हाळ्याच्या मागण्या पूर्ण केल्या जाणार नाहीत तोपर्यंत हे ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा ठाम निर्णय दादाहरी वडगाव ग्रामस्थांनी घेतला आहे. आज या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तुळशीराम पवार यांनी भेट देऊन सहभाग घेतला.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!