MB NEWS:वैद्यनाथाची दसरा पालखी परिक्रमा पाच मानकऱ्यांसह निघणार

 वैद्यनाथाची दसरा पालखी परिक्रमा पाच मानकऱ्यांसह निघणार; जिल्हाधिकाऱ्यांची अटीसह परवानगी



परळी : प्रतिनिधी...

 जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दसऱ्याच्या दिवशी प्रभू वैद्यनाथाची पालखी मिरवणूक परिक्रमेस काही अटीसह परवानगी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी अटीचे पालनकरून दसरा परिक्रमा पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याने हा पारंपारिक सोहळा खंडित होणार नाही  

 

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिलेल्या परवानगीनुसार श्री प्रभू वैद्यनाथाची पालखी मिरवणूक परिक्रमा वाहनातून पाच मानकऱ्यांच्या सहभागाने करावी. यावेळी वाहन कुठेही न थांबवता कमीत कमी वेळेत परिक्रमा पूर्ण करावी. पाचपेक्षा जास्त भाविकांनी व मानकरी यांनी गर्दी करू नये. संसर्गजन्य स्थिती असल्याने या अटीचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रेखावार यांनी शुक्रवारी श्री वैजनाथ मंदिराचे सचिव राजेश देशमुख यांना दिल्या आहेत. यासोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सीमोल्लंघन स्थळी गर्दी करू नये असे आवाहनही करण्यात आले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार