MB NEWS:प्रभाग क्रमांक ५ मधील लाभार्थ्यांना घरकुलचे पहिल्या टप्प्यातील धनादेश प्रदान

 प्रभाग क्रमांक ५ मधील लाभार्थ्यांना घरकुलचे पहिल्या टप्प्यातील धनादेश प्रदान 



परळी वैजनाथ,प्रतिनिधी...

परळी शहरातील विविध भागातील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत १३५७ प्रस्ताव मंजूर झाले  आहेत. त्यांपैकी ४०६ लाभार्थींना  धनादेश  वाटप करण्यात येत आहेत. ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळी शहरातील पंतप्रधान आवास योजनेतील ४०६ लाभार्थींना पहिल्या टप्प्यातील प्रत्येकी ४० हजार रुपये रक्कमेचे धनादेश वितरित करण्याचा नुकताच शुभारंभ करण्यात आला.

      सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व न.प.गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या सहकार्याने नगर परिषदेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रभाग ५ मधील लाभार्थ्यांना घरकुलचे पहिल्या टप्प्यातील धनादेश प्रदान करण्यात आले.घरकुल योजनांमूळे नविन वास्तू निर्मिती होतील.या कार्यक्रमास माझ्यासह, लक्ष्मण वाघमारे, बळीराम नागरगोजे, हनुमान आगरकर, दिनेश आमले, अर्जुन साखरे, सचिन लगड, सचिन आरसुडे, रावसाहेब आंधळे, उत्तम आरसुळे, राजाभाऊ गित्ते, गोविंद कुकर,बालाजी काळे, शैलेश कदम, मुंजाजी तळेकर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !