MB NEWS: *कामावर रुजू व्हा, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आदेश; परिपत्रक जारी*

 


*कामावर रुजू व्हा, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आदेश; परिपत्रक जारी*

मुबई : राज्यात अनलॉकच्या विविध टप्प्यातंर्गत टप्प्या-टप्प्याने सर्व काही पूर्ववत करण्यात येत आहे. यानुसार आता राज्य सरकारने शाळा, महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थामधील ऑनलाइन, ऑफलाईन आणि दूरस्थ शिक्षणासाठी मान्यता दिली आहे. त्यानुसार आता 50 टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नुकतंच याबाबतच परिपत्रक शासनाने जारी केलं आहे.

शासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, राज्यात मिशिन बिगेन अगेन अतंर्गत राज्यातील सर्व आस्थापना टप्प्या-टप्प्याने सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येत आहेत. त्याच धर्तीवर मिशिन बिगेन अगेन या कार्यक्रमातंर्गत राज्यात विविध प्रकारचे उपक्रम सुरु करण्यासाठी काही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शैक्षणिक सत्राशी संबंधित उपक्रम सुरु करण्यास सहमती दिली आहे.

राज्यातील शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत विद्यार्थ्यांसाठी आणि नियमित वर्ग घेण्यासाठी बंद राहतील. मात्र ऑनलाईन/ ऑफलाईन शिक्षण आणि दूरस्थ शिक्षण सुरु करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे.

ऑनलाईन/ ऑफलाईन शिक्षण/ दूरस्थ शिक्षण/ आणि त्याच्याशी संबंधित कामकाज करण्यासाठी राज्यातील शासकीय, खाजगी अनुदानित, विनाअनुदानित, इत्यादी सर्व प्रकारच्या शिक्षण संस्थांमार्फत चालवण्यात येणाऱ्या शाळांमधील 50 टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिक्षणाशी संबंधित कामासाठी तात्काळ कामावर रुजू व्हावे, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार