MB NEWS:भाजयुमो प्रदेश सचिव पदी परळीचे अॅड.अरुण पाठक यांची नियुक्ती*

 *भाजयुमो प्रदेश सचिव पदी परळीचे अॅड.अरुण पाठक यांची नियुक्ती*



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

    भाजपच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांचे कट्टर समर्थक परळीचे अॅड.अरुण पाठक यांची भाजयुमो प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

     अॅड.अरुण पाठक हे भाजप विद्यार्थी आघाडी पासून संघटनात्मक कामात आहेत.विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडलेल्या आहेत.युवकांचे संघटन व भाजयुमो च्या माध्यमातून सातत्याने ते संघटनास्तरावर क्रियाशील आहेत.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश पातळीवर महत्त्वपुर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.नुकतीच त्यांची प्रदेश सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.याबाबतचे नियुक्ती पत्र त्यांना पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणीमध्ये 'सचिव' म्हणून निवड करुन सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रदेश स्तरावर काम करण्याची संधी दिल्याबद्दल नेत्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजाताई मुंडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश उपाध्यक्ष खासदार डॉ. प्रितमताई मुंडे, भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील,योगेश अण्णा टिळेकर,विभाग संघटन मंत्री संजय भाऊ कौडगे तसेच पक्षातील सर्व मार्गदर्शक, सहकारी,पदाधिकारी व हितचिंतकांचे अॅड.अरुण पाठक यांनी आभार मानले आहेत.

         पक्षाने दिलेल्या या संधीमुळे मला अधिक ऊर्जा मिळाली असून या संधीच्या माध्यमातून युवकांचे प्रश्न मांडून न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करील व माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार