MB NEWS:मारवाडी युवा मंच आयोजित स्पर्धांचे बक्षीस वितरण संपन्न राज्यभरातील शेकडो स्पर्धकांनी नोंदवला होता सहभाग

 मारवाडी युवा मंच आयोजित स्पर्धांचे बक्षीस वितरण संपन्न

 

राज्यभरातील शेकडो स्पर्धकांनी नोंदवला होता सहभाग

 


परळी । प्रतिनिधी

मारवाडी युवा मंच, परळी वैजनाथ यांच्या वतीने मारवाडी समाजासाठी मारवाडी भाषेतच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. एकूण १० प्रकारच्या स्पर्धांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश होता. राज्याच्या कानाकोपऱ्यातील शेकडो स्पर्धकांनी या स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवला होता. या स्पर्धांचा नुकताच निकाल लागला असून, कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर परळीतील स्थानिक विजेत्यांना प्रायोगिक स्वरूपात बक्षीसांचे वितरण करण्यात आले आहे तर उर्वरित विजेत्यांना त्यांचे बक्षीस हे पोस्टाद्वारे पाठविण्यात आले आहे. स्व.मोहनलालजी बियाणी अन्नक्षेत्र येथे मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, प्रकल्प अधिकारी चंद्रप्रकाश काबरा, मारवाडी युवा मंचचे उपाध्यक्ष सतिश सारडा, अशोक कांकरिया यांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा पार पडला.

मारवाडी समाजासाठी मारवाडी भाषेतच राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन मारवाडी युवा मंच, परळी वैजनाथ यांच्या वतीने करण्यात आले होते. निबंध, घुमर नृत्य, भजन-आरती, मेहंदी, मारवाडी भाषेतील म्हणी, कहानी-गीत गायन, चित्रकला, भरतकाम, वक्तृत्व, वेशभूषा अशा १० प्रकारच्या स्पर्धांचा यामध्ये समावेश होता. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेकडो स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग या स्पर्धांमध्ये नोंदवला. नुकतीच विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून, प्रायोगिक स्तरावर परळीतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसांचे वितरणही करण्यात आले. विजेत्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक, शाल, श्रीफळ व पुस्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. त्याचबरोबर सहभागी सर्वांना ऑनलाईन प्रशस्तीपत्र देण्यात आले. या स्पर्धांचे परीक्षण सौ.भक्ती निलेशजी राठी-गंगाखेड, सौ.दीपा राजगोपालजी बंग-परळी वै, सौ.पुनमजी अग्रवाल-परळी वै, सौ.गीता हनुमान धुत-गंगाखेड, सौ.पायल अभिषेकजी झंवर-धर्माबाद, सौ.हेमा राजगोपालजी तोष्णीवाल-परळी वै. श्री.राजकुमार हरीप्रसादजी लाहोटी-परळी वै. यांनी केले. मारवाडी युवा मंचच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या नावे पुढीलप्रमाणे आहेत... मारवाडी भाषेतील म्हणी स्पर्धा : १)  सौ.सुलोचना मुरलीधरजी सारडा, परली वैजनाथ, २) सौ.गीता करवा-सेलू, ३) सौ. कल्पना कैलाशजी झंवर-नांदेड, प्रोत्साहन १)सौ.शीतल अमितजी मंत्री-बीड, २) कु. समीक्षा सत्यनारायणजी भूतड़ा माजलगांव, निबंध प्रतियोगिता :१) सौ.नेतल पंकजकुमारजी धुत-अंबेजोगाई, २) सौ.विद्या प्रेमकुमारजी डागा, परभणी ३) सौ.सावित्री लक्ष्मीनारायण भुतडा-नाशिक,  प्रोत्साहन १) सौ. तेजल मुकेशजी समदानी-कसोदा (जळगाव) २) अडवोकेट सौ.सपना गोपालजी दरक-लातूर, भरतकाम स्पर्धा : १) पुष्पा भिकुलालजी करवा, जालना २) सौ शोभना सत्यनारायणजी बाहेती ३) सौ. ज्योति मुरलीधरजी लड्डा-गंगाखेड कहानियां गीत प्रतियोगिता: १) सौ. पायलजी हुरगट धर्माबाद जिला नांदेड़ २) सौ नेहा रोहितजी सारडा-सोनपेठ जिला परभणी ३) कु. गौरी नारायणजी सारडा औरंगाबाद, प्रोत्साहन १) पलक्षा श्रीकांतजी करवा रिसोड, भजन प्रतियोगिता : १) डॉ. सौ.श्रेया निहारजी चांडक-परभणी, २) सौ.सपना कल्पेशजी बियाणी-परळी वै. ३) सौ.जयश्री बंकटलालजी  जोशी-गंगाखेड, प्रोत्साहन :१) कु.प्रीति सत्यनारायणजी तोषनीवाल-नांदेड़, २) सौ.गंगा राधेश्यामजी अग्रवाल-अमलनेर (जळगाव), छोटो प्रोत्साहन: गौरव जयप्रकाशजी लड्डा-परळी वै., चित्रकला : १)  सौ. अनुराधा श्रीकांतजी नावंदर – नाशिक, २)  सौ. मोनिका केदारजी लोहिया-परळी वै. ३)  कु.डॉ.राधिका पुरषोत्तमजी मुंदड़ा-अंबड़, जि.जालना, प्रोत्साहन: १) सौ. शकुंतला अजितजी सारडा- संगमनेर, जि. अहमदनगर, सौ. निकिता रोहनजी मनियार-पुणे, वेशभूषा स्पर्धा : १) सौ.प्रनिता ऋषिकेशजी गिल्डा-अंबड, जि. जालना, २) सौ.दिव्या शुभमजी लोया-उदगीर, जि. लातूर, ३) सौ.एकता महेशजी दाड-परतुर, जि. जालना, प्रोत्साहन: १) सौ. ममता शामसुंदरजी जाखोटिया- अंबाजोगाई, जि. बीड, २) सौ. शीतल ओमप्रकाश सारडा-अनसिंग, जि. वाशिम, मेहंदी प्रतियोगिता : १) सौ. ज्योति अमोलजी राठी-वाशीम, २) कु.स्नेहल जयकिशनजी मंत्री-मुरुड जिला लातूर, ३) सौ.ममता मधूरजी तोषनीवाल-धारूर जिला बीड, प्रोत्साहन: १) सौ. तृप्ति हरीशजी भूतड़ा-उदगीर जिला लातूर २) सौ. मंगल गोविंदजी दरगड औरंगाबाद, घुमर नृत्य स्पर्धा :१) क्रिशा दिनेशजी राठी-पुणे, २) अनूष्का गोवर्धनजी भुतडा-नेरूल, मुंबई ३)ऋषिका बालाप्रसादजी चोकडा-अंबाजोगाई जिला बीड, प्रोत्साहन : १) आस्था पंकजजी राठी-तेल्हारा जिला अकोला २) जयश्री आनंदजी  तोषनीवाल-परली वै., भाषण प्रतियोगिता : १) सौ. तेजल मूकेशजी समदानी-कासोदा, जि. जलगांव, २)  कु. गौरी सारडा-औरंगाबाद, ३)  कु.विभा आनंदजी लड्डा- लासुर स्टेशन, जि. औरंगाबाद, प्रोत्साहन: १) सौ. दिपा धिरजजी बाहेती- परळी वै. २) सौ. राधिका मयुरजी कासट बीड

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार