MB NEWS: गेवराई,खाकीतला कर्तव्यतत्पर अधिकारी: सपोनि संदिप काळे

 खाकीतला कर्तव्यतत्पर अधिकारी: सपोनि संदिप काळे



 गृहमंत्री आनिल देशमुख यांनी फेसबुकवर फोटो शेअर करुन स पो नि संदिप काळे यांचे केले कौतुक.

गेवराई (प्रतिनिधी ) खाकी वर्दी म्हटलं की "सदरक्षणाय खलनिग्रहणाय" हे ब्रिदवाक्य घेऊन काम करण्यासाठी सततची धडपड परंतु खाकी वर्दीतले काही माणसे हे वेगळ्या पद्धतीने काम करत सर्वसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतात.आणी त्यांच्या त्या कामामुळे ते लोकप्रिय ही ठरत आहेत.  

    गेवराई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे असे त्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव असुन संदिप काळे हे गेवराई ठाण्यात मागील काही दिवसांपासून कार्यरत आहेत. ज्या दिवशी पासुन एपीआय काळे हे गेवराई पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत आहेत त्या दिवशी पासुन त्यांची काम करण्याची शैली पाहुन तालुक्यातील अनेक नागरीक हे त्यांचे फॅन झाले आहेत. अत्यंत शांत , संयमी तसेच लोकाभिमुख अधिकारी म्हणुन एपीआय संदीप काळे यांनी कमी दिवसांत कामाच्या जोरावर लोकप्रियता मिळवून आपले नावलौकीक केले आहे. आणि अशाच एका घटनेमुळे एपीआय काळे हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे ती घटना म्हणजे काही दिवसांपूर्वी तालुक्यातील एरंडगाव येथील एका ऊसतोड मजुराने आत्महत्या केली होती आणि त्या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काळे यांच्याकडे आहे.त्या घटनेचा पंचनामा करण्यासाठी काळे हे एरंडगाव येथील घटनास्थळी जात होते. परंतु जायला व्यवस्थीत रास्ता नव्हता त्यामुळे संदीप काळे हे आपले बुट काढून पॅंट फोल्ड करुन चिखल तुडवीत घटनास्थळ गाठुन आपले कर्तव्य पुर्ण केले त्यांचे ते फोटो सोशल मिडियावर अत्यंत व्हायरल होऊन त्यांच्यांवर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे. एपीआय काळे हे असेच एकदा लाॅकडाउन काळात ही आपल्या कामाच्या जोरावर समोर आले होते आणि आजही आले आहेत. त्यांच्यासारखे अनेक अधिकारी आपल्या राइटरच्या माध्यमातून कामे पुर्ण करतात मात्र कुठलंही काम असो न डगमगता एपीआय काळे स्वत: पुर्ण करतात अशा कामाच्या जोरावर संदीप काळे यांची एक चांगली प्रतीमा लोकांसमोर तयार झाली आहे . एपीआय काळेंसारख्या काम करण्याची जिद्द असणाऱ्या  अधिकाऱ्याला एखाद्या पोलीस स्टेशनचे लवकरच पदभार देणे अत्यंत गरजेचे आहे. अशा कर्तव्यदक्ष व प्रमाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांला सलाम.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !