मोठ्या संख्येने उपस्थित रहा....

इमेज
द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आज आयोजन परळी वैजनाथ | प्रतिनिधी द्रोणाचार्य सेमी इंग्लिश स्कूल व पूजा प्राथमिक विद्यालय, परळी वैजनाथ यांच्या वतीने २० वे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे स्नेहसंमेलन आज  बुधवार, दि. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे  नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामलिंग राजनळे सर (माजी मुख्याध्यापक, वैद्यनाथ विद्यालय) राहणार असून उद्घाटन  गणेश गिरी (गटशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र, परळी वै.) यांच्या हस्ते होणार आहे. या काकार्यक्रमास बाजीराव  भैय्या   धर्माधिकारी (माजी नगराध्यक्ष),  कोकणे  (विस्ताराधिकारी),  धनंजय ढोणे  (पोलीस निरीक्षक),  दिवाकर जोशी (गझलकार), प्रा. रविंद्र जोशी सर (पत्रकार,  दैनिक पुढारी),  व्यंकटेश शिंदे (नगरसेवक) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.           स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचे नृत...

MB NEWS: *भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या अज्ञात समाजकंटकांला तात्काळ अटक करा― प्रा.टी. पी.मुंडे*

 *भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या अज्ञात समाजकंटकांला तात्काळ अटक करा― प्रा.टी. पी.मुंडे*



परळी /प्रतिनिधी


बर्दापूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथील पोलिस स्टेशन जवळ असलेला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याची समाजकंटकांनी विटंबना केल्याची घटना घडली या घटनेचा जाहीर निषेध करून समाजकंटकांना त्वरित अटक करून कठोरातील कठोर शिक्षा करावी अशी मागणी  प्रा. टी.पी. मुंडे (सर )यांनी केलीे.


  काल बुधवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी पहाटे चार ते पाच या सुमारास समाजकंटकांकडून भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पोलिस स्टेशन जवळ असलेल्या पुतळ्याची विटंबना केली या घटनेचे तीव्र पडसाद बरदापुर व परिसरात उमटले. आंबेडकरांना मानणाऱ्या नागरिकांनी व नेत्यांनी रस्त्यावर येऊन ठिय्या आंदोलन व सरकार व पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली या घटनेमुळे आंबेडकरांना मानणाऱ्यात असंतोष पसरला आहे. 


   बर्दापूर पोलीस स्टेशन मध्ये समाजकंटका विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे मात्र अजूनही समाजकंटकांचा शोध पोलिसांना लागलेला नाही त्वरित समाजकंटकांचा शोध न लागल्यास याचा भयंकर परिणाम प्रशासन व शासनास भोगावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला.


   बर्दापूर पोलीस स्टेशन 24 तास उघडे असताना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना होतेच कशी? असा सवालही यांनी उपस्थित केला आहे. महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना होणे ही पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारी नाही आणि दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात पुरोगामी सरकार असताना महाराष्ट्रात महापुरुषांची विटंबना होणे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे .या प्रकरणात बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालून त्वरित समाजकंटकांचा शोध घेऊन अटक करा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा  प्रा.टी. पी. मुंडे (सर) यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....