MB NEWS:खरीप पिकांचे काढणी पश्‍चात नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांनी विमा कंपनीस कळवावे-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

 खरीप पिकांचे काढणी पश्‍चात नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांनी विमा कंपनीस कळवावे-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी



बीड......

      खरीप पिकांचे काढणी पश्‍चात नुकसान झाले असल्यास शेतकऱ्यांनी विमा कंपनीस कळवावे असे आवाहनजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

      

        पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत खरीप पिकांचे काढणी पश्‍चात नुकसान झाले असल्यास विमा कंपनीस कळवणे आवश्यक आहे. माहे ऑक्टोबर महिन्यात बीड जिल्ह्यामध्ये सर्वत्र पाऊस होत आहे. सध्या खरीप पीक काढणी हंगाम अंतिम टप्प्यात आहे व काही शेतकऱ्यांनी पिके काढून गोळा न करता शेतात वाळवण्यासाठी ठेवलेले आहेत. मागील दोन-तीन दिवसात झालेल्या पावसामुळे सदरील पिकांचे नुकसान झाले असल्यास या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरविला आहे. त्यांनी अधिसूचित पिकांसाठी च्या अधिसूचित क्षेत्रातील शेतात कापणीपासून 14 दिवसाच्या आत गारपीट ,चक्रीवादळ , अतिवृष्टी , ढगफुटी व अवकाळी यामुळे झालेल्या नुकसानीचे वैयक्तिक स्तरावरून पंचनामे करून नुकसान ग्राह्य धरता येतात. यासाठी शेतकऱ्यांनी सदरची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत याबाबतची सूचना विमा कंपनी व कृषी विभागास देणे बंधनकारक आहे. यामध्ये नुकसान कळविताना सर्वे नंबर व नुकसान ग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक आहे. प्राप्त झालेल्या सूचनेनंतर संयुक्त समिती शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी करील. यामध्ये विमा कंपनी, प्रतिनिधी कृषी अधिकारी व संबंधित शेतकरी यांचा समावेश असेल. तालुकास्तरावर पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात उपलब्ध आहेत. त्यांचे नाव व संपर्क क्रमांक खाली नमूद केले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोर वरून क्रॉप इन्शुरन्स हे ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती द्यावी किंवा 1800 165 15 या टोल फ्री क्रमांकावर किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात अर्ज करून कळवावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड यांच्या वतीने करण्यात येत आहे.

         बीड सोनवणे महेश निवृत्ती 86 0 50 680 88 आष्टी शेख शहजानपुर मुक्तार 77 21 84 01 01 पाटोदा गोल्हार संपत अश्रुबा 97 64 55 22 03 शिरूर कासार कंठाळे विशाल हरिभाऊ 82 61 94 85 88 गेवराई चिकने धनंजय जगन्नाथ 97 67 23 75 05 धारूर देशमुख व्ही आर 97 67 23 75 05 वडवणी देशमुख जीवराज भास्कर 95 95 14 28 96 माजलगाव मोरे अशोक सुखदेव 89 79 02 63 22 परळी फड नागेश्वर 90 67 97 01 80 केज केदार ओंकार लहू 94 0 58 57 777 अंबाजोगाई इ मुंडे सोपान भानुदास 90 96 60 7952

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार