MB NEWS:शरद पवार विचार मंचच्या परळी शहराध्यक्षपदी श्रीकांत माने यांची निवड


 शरद पवार विचार मंचच्या परळी शहराध्यक्षपदी श्रीकांत माने यांची निवड



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

सबंध महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘मा.श्री.शरद पवार विचार मंच’ या संघटनेच्या परळी शहराध्यक्षपदी येथील युवक कार्यकर्ते श्रीकांत बाळासाहेब माने यांची निवड झाली आहे. 

या निवडीचे पत्र मंगळवारी (दि.20) राष्ट्रवादी काँगे्रसचे ज्येष्ठ नेते व परळी नगर पालिकेतील गटनेते वाल्मिकअण्णा कराड यांच्या हस्ते श्रीकांत माने यांना देण्यात आले. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या येथील ‘जगमित्र’ या संपर्क कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँगे्रसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष श्रीनिवास देशमुख, युवक नेते शंकर कापसे, नितीन कुलकर्णी, श्री बिडगर, रामेश्वर महाराज कोकाटे, नरेश वाळके, ॠषीकेश राठोड, यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या निवडीबद्दल पालकमंत्री धनंजय मुंडे, संघटनेचे  प्रदेशाध्यक्ष मा.अमित अंकुशराव ढमाळ, राष्ट्रवादी काँगे्रस डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, राष्ट्रवादी काँगे्रसचे ज्येष्ठ नेते चंदुलाल बियाणी, नगरसेवक दीपक देशमुख आदी मान्यवरांसह कार्यकर्त्यांनी श्रीकांत माने यांचे अभिनंदन केले आहे.

गेल्या पंचवीस वर्षापासून म्हणजे 1996 पासून महाराष्ट्रात सामाजिक क्षेत्रात ही संघटना कार्यरत असून विविध समाजोपयोगी उपक्रम, कार्यक्रम संघटनेच्या माध्यमातून राबविले जातात. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा चालवणारी व आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराने राज्यभर सामाजिक कार्य करणारी व तळागळातील सर्वसामान्यांना स्वावलंबी करून त्यांना हात बळकट करणारी ही संघटना आहे. 

या संघटनेच्या परळी शहराध्यक्षपदी निवड केल्याबद्दल श्रीकांत माने यांनी मान्यवरांचे आभार मानले आहेत. आपल्यावर विश्वास ठेवून परळी शहराध्यक्षपदी केलेली निवड सार्थ ठरवून दाखवू, संघटनेचे कार्य परळी शहर व तालुक्यात वाढण्यासाठी प्रयत्न करू असेही या निवडीनंतर श्री माने यांनी सांगितले.

------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !