MB NEWS:रविवारी ना धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बिझनेस आॅन व्हील संबंधित उपक्रमांच्या नोंदणी शिबिराचा शुभारंभ

 रविवारी ना धनंजय मुंडे यांच्या हस्ते मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बिझनेस आॅन व्हील संबंधित उपक्रमांच्या नोंदणी शिबिराचा शुभारंभ



 परळी वैजनाथ, प्रतिनिधी..      

        मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत बिझनेस आॅन व्हील संबंधित उपक्रम नोंदणी शिबिराचा शुभारंभ रविवारी परळीत राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिली आहे. 

         रविवार दि.११ रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे नोंदणी शिबिराचा शुभारंभ होणार आहे. ना धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बेरोजगारांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने 'माझा व्यवसाय माझा हक्क' शिबिर घेण्यात येत आहे.कोरोनाच्या बिकट परिस्थितीमध्ये बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे या दृष्टिकोनातून स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने परळी मतदारसंघासाठी या योजनेचा अधिकाधिक लाभ देण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत विविध व्यवसायांसाठी वाहन,कर्ज उपलब्धी, सबसिडी, आवश्यक वाहने, साधनसामग्रीची व्यवस्था आदींबाबत सबसिडी बरोबरच कर्ज व आर्थिक हातभार लावण्यात येणार आहे. परळी मतदारसंघातील बेरोजगारांसाठी व स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्यांसाठी ही मोठी उपलब्धी ठरणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी शिबिराचे आयोजन 'माझा व्यवसाय माझा हक्क' या सदराखाली करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत भाजीपाला फळे विक्री, चाट भंडार,कृषी विषयक वाहतूक, वडापाव विक्री, आईस्क्रीम विक्री, बिर्याणी व्यवसाय ,इडली डोसा उत्तपा व्यवसायिक, फिरते साहित्य विक्री, यासह आपल्या आवडीच्या विविध व्यवसायांसाठी लागणाऱ्या वाहनांची उपलब्धता करून देण्यात येणार असून या वाहनांसाठी कर्ज व सबसिडी असा अर्थिक आधार देण्यात येणार आहे. या अतिशय महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर दि.११ते२५ या कालावधीत असणार आहे.

     रविवार दिनांक अकरा रोजी सकाळी 11 वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे या नोंदणी शिबिराचा शुभारंभ ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. तरी या योजनेचा अधिकाधिक बेरोजगारांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेसंबंधी अधिक माहितीसाठी न.प. गटनेते वाल्मीक अण्णा कराड, विधानसभा अध्यक्ष गोविंदराव देशमुख,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, रणजित चाचा लोमटे, जगमित्र कार्यालय परळी वैजनाथ यांच्याकडे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार